नंदुरबारला २७५ ऑक्‍सिजन बेडचे कोविड सेंटर 

oxygen covid center
oxygen covid center

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नंदुरबार येथील एकलव्य रेसिडेन्सीत २७५ ऑक्‍सिजन बेडचे जम्बो कोविड सेंटर, प्रकाशा येथे एक हजार लोकांसाठी विलगीकरण कक्ष, नवापूर येथे ५० ऑक्‍सिजन बेड व १५० जणांसाठी लवकरच विलगीकरण कक्ष स्थापन करणार आहे. यासाठी आजच तीन कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबत माहिती देताना ॲड. पाडवी म्‍हणाले, की जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे. यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. याचे वाटपही अन्न व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. या औषधाबाबत राजकारण केले जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत कोणीही राजकारण करू नये. 

गावातच विलगीकरण कक्ष
नंदुरबार जिल्ह्यात २० दिवसांत कोरोना रुग्ण वाढले आहेत. एक महिन्यापूर्वी शहरी भागात ८० टक्के तर ग्रामीण भागात २० टक्के कोरोना रुग्ण आढळत होते. आता शहरी भागात ६० व ग्रामीण भागात ४० टक्के रुग्ण आढळत आहेत. यासाठी ग्रामीण भागात विलगीकरण कक्ष स्थापण्याच्या सूचना दिल्या. यातही विलगीकरणात बदल केले आहे. त्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित होणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे. यासह विलगीकरणाचे सेंटर प्रकाशा येथील धर्मशाळेत एक हजार लोकांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहे. नवापूर येथे १५० जणांसाठी ऑक्सिजन बेडची व्यवस्था करणार आहे. लवकरच जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे. नवापूर येथे आधी २० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली होती. यात पुन्हा ५० ऑक्सिजन बेड उभारणार आहे. 

एमडी मेडिसिनसाठी लवकरच डॉक्‍टर
आकांक्षित जिल्ह्यासाठी आलेला निधी व डीपीटीसीअंतर्गत असलेला निधी यासाठी वापरणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी विलगीकरण कक्षात दाखल व्हावे, असे आवाहन पाडवी यांनी केले. यासह जिल्ह्यात एमडी मेडिसिनसाठी सहा ते सात डॉक्टर लवकरच दाखल होणार आहेत. नागरिकांनी येणाऱ्या दिवसातील सगळे उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्‍हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्याधिकारी नितीन बोडके आदी उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com