दुसरी बायको करतो म्‍हणाला म्‍हणून शालकाने केला मेव्हण्याचा खून

murder case
murder case

तळोदा (नंदुरबार) : बहिणीवर उपचार न करणाऱ्या मेव्हण्यावर शालकाने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना शनिवार (२० मार्च) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास माळ खुर्द (ता. तळोदा) येथे घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी शालकास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माळ खुर्द येथे राहणाऱ्या गणपत दिवाल्‍या वसावे (वय 29) याचा माळखुर्द येथेच राहणाऱ्या परंतु हल्ली कल्याण (जि. ठाणे) येथे असणाऱ्या किसन गवल्‍या वळवी यांच्या बहिणीशी विवाह झाला होता. 

त्‍यापेक्षा दुसरी बायको करेल
गणपत वसावे नेहमी किसन वळवी यास सांगत असे की तुझ्या बहिणीच्या उपचारावर खर्च करण्यापेक्षा तेवढ्या पैशावर मी दुसरी बायको करेल. याचा राग किसन वळवीच्या मनात होता. याच रागातून शनिवारी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास मेव्हणा असलेल्या गणपत वसावे याचा शरीरावर कुऱ्हाडीने वार करत गंभीर दुखापत करून जागीच ठार मारले. त्यामुळे माळ खुर्द गावात एकच खळबळ उडाली.

रात्रीच केली अटक
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, पोलीस हवालदार महेंद्र जाधव, पोलिस नाईक युवराज चव्हाण, विनोद नाईक यांनी रात्रीच सातपुड्याच्या दुर्गम भागातील माळ खुर्द गाठले. घटनेची माहिती घेऊन शालक असलेल्या किसन गवल्‍या वळवी यास ताब्यात घेतले. मयताचे वडील दिवल्‍या मोत्‍या वसावे यांच्या फिर्यादीवरून किसन वळवी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे करीत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com