ई-फेरफार प्रणालीमध्ये नंदुरबार राज्यात प्रथम

ferfar system
ferfar system

नंदुरबार : महसूल विभागाच्या ई- फेरफार प्रणालीमध्ये प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबितता कमी करणेबाबत नाशिक विभागात उल्लेखनीय कामकाज झाले असून नाशिक विभागातील नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे.
 
ई- फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा नियमित घेण्यात आलेला आहे. नाशिक विभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अथक मेहनत घेऊन राज्यात ई-फेरफार प्रणालीमधील प्रलंबित फेरफार यांची प्रलंबितता कमी करून विभागातील जनतेला दिलासा देणारे कामकाज केले आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. 

सर्व सेवांचा लाभ घेता येणे शक्‍य
महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सोपे जावे म्हणून महाभूमी हे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून या संकेतस्थळाच्या आधारे कोणालाही महसूल विभागाच्या सर्व सशुल्क आणि निशुल्क सेवांचा लाभ घेता येणार आहे, अशी माहितीही विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिली आहे. 

दृष्टिक्षेपात कामगिरी 
राज्य स्थान... तालुके.. भरलेल्या नोंदी...प्रमाणित नोंदी... टक्केवारी 
१) नंदुरबार - ६...….. १३५७७९....... १३३०२६..... ९७.९७ 
२) अहमदनगर..१४.... १०५५८१७..... १०३२७३७.... ९७.८१ 
३) जळगाव…. १५..... ९८७९८२...…. ६७२८२२.... ९७.८० 
४) धुळे...…...४...…. २६८१७७...... २६२१६१..... ९७.७६ 
५) नाशिक….१५...…. ६४७५६८...... ६३१९३४.... ९७.५९ 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com