मालाला भाव नाही अन्‌ खतांच्या किमती आवाक्‍याबाहेर

मालाला भाव नाही अन्‌ खतांच्या किमती आवाक्‍याबाहेर
fertilizer prices
fertilizer pricesfertilizer prices

शहादा (नंदुरबार) : अत्यल्प उत्पादन, उत्पादित मालाला कवडीमोल दर, पिकेल ते चांगल्या दराने विकेल याची शाश्वती नसतानाही उद्याचा आशेवर जगणाऱ्या बळीराजाचे (Farmer) अर्थकारण रासायनिक खतांच्या (Chemical fertilizer prices) किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे पुरते कोलमडले आहे. खरिपाच्या तयारीतच या दरवाढीमुळे आर्थिक संकट घोंगावत आहे. (nandurbar news farmer problem fertilizer prices high)

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. कोरोना काळात आधीच लॉकडाउनने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना ही दरवाढ दुष्काळात तेरावा महिना ठरणारी आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे. त्यातच या दरवाढीने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना यंदाही कमी होताना दिसत नाहीत.

fertilizer prices
लाखभर भाडे देवून टरबूज नेले दिल्लीला अन्‌ झाली फसगत!

हाती कवडीही शिल्‍लक नाही

आधी बोंडअळी, दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना, लॉकडाउन, संचारबंदी, आणि आता रासायनिक खतांची दरवाढ झाल्याने यंदा शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडणार आहे. लॉकडाउनमुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा उत्पादनाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती कवडीही शिल्लक नाही. कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत भरमसाठ वाढ झाली आहे. काही ग्रेडचा खतांमध्ये ५०० ते ८०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवीन संकट उभे राहिले आहे.

दरवाढ कमी करण्याची मागणी

शहादा तालुक्यामध्ये चार-पाच वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि ह्या वर्षीपासून तर भयानक लॉकडाउन, संचारबंदी, बाजार समितीत्याही काही काळ बंद पडल्यामुळे उत्पादित मालाची विक्री करता येत नव्हती. त्यातच भर म्हणून की काय खतांमध्ये भावात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अजूनही कृषी दुकानदारांची गेल्या वर्षीची उधारी वसूल झाली नाही. खतांमध्ये झालेली भाववाढ ही शेतकऱ्यांच्या मुळावरच आली असून ती कमी करण्याची मागणी शहादा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com