esakal | बिबट्याच्या जबड्यात होती बालिका; आरडाओरड केली आणि
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

बालिका आपल्या कुटुंबासमवेत वाल्हेरी येथे नातेवाईकांकडे आली होती. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने बालिकेवर हल्ला केला.

बिबट्याच्या जबड्यात होती बालिका; आरडाओरड केली आणि

sakal_logo
By
धनराज माळी

आमलाड (नंदुरबार) : वाल्हेरी (ता. तळोदा) येथे सहा वर्षीय बालिका बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली. बालिकेस तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या बालिकेवरील हल्ल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 
डोंगरीपाडा (ता. अक्कलकुवा) येथील रविता शामा वळवी ही बालिका आपल्या कुटुंबासमवेत वाल्हेरी येथे नातेवाईकांकडे आली होती. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने बालिकेवर हल्ला केला. त्यात तिच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. आरडाओरड केल्याने परिसरातील लोक जमल्याने बिबट्याने पळ काढला. त्यामुळे बालिका वाचल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती कळताच तहसीलार गिरीश वाखारे यांनी भेट देत बालिकेचा विचारपूस केली.उपजिल्हा रुग्णालयात डॉ विजय पाटील यांनी बालिकेवर उपचार केलेत.पुढील उपचारासाठी बालिकेस उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. प्रकृती स्थिर असल्याचे सांगणयात आहे.   

बिबट्याचा वावर कायम
परिसरात गेल्‍या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर कायमचा झाला आहे. शेतात काम करणाऱ्यांना अनेकदा बिबट्या नजरेस पडत आहे. शिवाय, बिबट्याने हल्‍ला चढविल्‍याने जनावरे देखील दगावली आहे. यामुळे बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे 

loading image
go to top