७५ वर्षांपासून ग्रामपंचायतीचा ‘रावल’; तीन पिढ्यांची अशीही परंपरा 

sarangkheda gram panchayat
sarangkheda gram panchayat

सारंगखेडा (नंदुरबार) : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी पुन्हा एकदा एक हाती सत्ता प्राप्त केली. त्यांचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. गत ७५ वर्षांपासून ग्रामपंचायतीवर रावल परिवाराची सत्ता अबाधित राहिली आहे. गावासह परिसराचे सत्ता व राजकारण रावल परिवाराभोवती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आशिया खंडात चेतक फेस्टीव्हल, अश्व बाजार आणि एकमुखी दत्तची यात्रा याकारणांनी प्रसिद्ध असलेल्या जिल्हयातील सर्वात मोठ्या सारंगखेडा ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांच्या गटाला सर्व १७ जागांवर विजय मिळाल्याने ग्रामस्थांचा त्यांचेवरील विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. 

७५ वर्षांपासून रावल परिवाराची सत्‍ता
सारंगखेडा गावाची लोकसंख्या १५ हजार आहे. सन १९३८ पासून आजतागायत या पंचायतीवर रावल परिवाराची सत्ता आहे. ७५ वर्षांपासून येथील प्रतिष्ठित रावल कुटुंबाकडे सत्ताकेंद्र राहिले आहे. गावातील असलेला संपर्क उपयोगी पडण्याची परंपरा आणि जनतेचा विश्वास यावर हे सत्ताकेंद्र आजही अबाधित आहे. १९३८ ते १९८५ पर्यंत बिनविरोध निवडीची परंपरा १९९०ला खंडीत झाली होती. मात्र २००५चा अपवाद वगळता झालेल्या सर्व निवडुणूकांमध्ये रावल गटाचेच उमेदवार विजयी झाले आहेत. मध्यंतरी २००५ला निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर निवडणूकीत रावल गटाला एक हाती सत्ता मिळाली आहे. 

तीन पिढ्यांची अशीही परंपरा
सलग तीन पिढ्यांकडे ही सत्ता सारंगखेडावासीयांनी सोपविली आहे. त्यासाठी जनसंपर्क, गावातील काम आणि विश्वास यातून सत्ता आपल्या भोवती ठेवण्याची किमया रावल परिवाराने केली आहे. परीवारातील अगोदर बापजी रावल नंतर नानासाहेब रावल व आता जयपाल रावल हे सरपंचपदी राहीले आहे. आज झालेल्या मतमोजणीअंती मतदारांनी पुन्हा हाच कौल दिला आहे.

आजच्या मतमोजणीत मिळालेली मते (प्रभाग व उमेदवार निहाय)

प्रभाग १ 
- पृथ्वीराजसिंह रावल (२८६)
- सोनाली मोरे (२७७)
- ऐश्वर्यादेवी रावल (२९९)

प्रभाग २ 
- दर्शन पाटील (४६८)
- ज्योती पाटील (४५४)
- पूर्वा पाटील (४४१)

प्रभाग ३
- शाहीर भिल (४२४)
- मीना कोळी (५०५)

प्रभाग ४
- गुड्डू भिल (३५०)
- धनराज चव्हाण (२७६)
- दिपीका ठाकरे (३१८)

प्रभाग ५
- मनोज भिल (३८२)
- संतोष मोरे (३२५)
- सिंधूबाई भिल (३८१)

प्रभाग ६
- प्रभाकर कुवर (४७८)
- अनिता भील (४६५)
- दुर्गा सोनवणे (३४५)

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com