ग्रा. पं. सदस्य नसतानाही मासिक सभेत हजेरी

ग्रा. पं. सदस्य नसतानाही मासिक सभेत हजेरी
gram panchayat member
gram panchayat membersakal

तळोदा (नंदुरबार) : रेवानगर ग्रामपंचायतीचे सदस्य (Gram panchayat member) तेरसिंग पावरा यांना मासिक सभेत अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत सदस्य नसताना देखील मासिक सभेत हजेरी लावण्यावर व त्यांना बोलू देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार गिरीष वखारे व पोलिसनिरीक्षक पंडित सोनवणे यांना देण्यात आले आहे. (gram-panchayat-meet-present-non-member)

gram panchayat member
पासींग नागालॅंड, नंबर प्लेट हरियाणा; कंटेनरमध्ये ४७ गुरे

रेवानगर ग्राम पंचायतीचा २०२१- २५ या कालावधीचा कार्यभार नुकताच सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या काळात ग्रामसभा झालेली नाही. मात्र मागील ४- ५ महिन्यांच्या कालावधीत फक्त मासिक सभा घेण्यात आल्या आहेत. परंतु त्या मासिक सभांमध्ये ग्रामपंचायत सदस्य सोडून त्यांचे प्रतिनिधी येऊन बसत आहेत. त्यात विषयांची मांडणी केली असता ग्रामपंचायतीचे जबाबदार सरपंच, ग्रामसेवक यांनी अवलोकन न करता अन्य व्यक्तीच मध्यस्थी करतात व कायद्याचा बाहेर काम करण्यास भाग पाडत आहेत. याबाबत मागील सभेत सूचना करण्यात आल्या होत्या.

कामे होवू देणार नाही म्‍हणत उडविली खिल्‍ली

दरम्यान १८ मेस ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीची मासिक सभा घेण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य तेरसिंग पावरा यांनी मासिक सभेत त्यांच्या प्रभागातील समस्या व अडचणी संदर्भात लेखी निवेदन दिले असता गैर ग्रामपंचायत सदस्य चिमा पावरा, रेशन दुकानदार नाथ्या पावरा, डेमश्या पावरा यांनी तेरसिंग पावरा यांची खिल्ली उडवली व तुम्ही कितीही अर्ज द्या, आम्ही तुमची कामे होऊ देणार नाही अश्या प्रकारची शाब्दिक टोचणी केली. त्यांवर सरपंच हिरालाल पावरा यांनी देखील काहीही दखल घेतली नाही.

gram panchayat member
धरण, तलावांमध्ये पोहणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

कारवाईची मागणी

ग्रामपंचायत सदस्य तेरसिंग पावरा यांना मासिक सभेत अपमानास्पद वागणूक देणाऱ्यावर योग्य कारवाही करावी, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन छेडतील असा इशारा दिला आहे. निवेदनावर माजी उपसरपंच दाज्या पावरा, ग्राम पंचायत सदस्य तेरसिंग पावरा, दुरश्या पावरा, बारक्या पावरा, पिंट्या पावरा आदींची नावे आहेत.

रेवानगर ग्रामपंचायत सदस्यांचे प्रतिनिधी सभांना उपस्थित राहत गावातील समस्यांवर कमी चर्चा करीत असून कायद्याच्या बाहेरची कामे करण्यास तगादा लावत आहेत. त्यामुळे मागील सभेत ग्रामपंचायत सदस्य व्यतिरिक्त इतरांनी मासिक सभेत बसू नये अशी सूचनाही देण्यात आली होती. तरीही यावेळेच्या मासिक सभेत काही सदस्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावत गोंधळ घातलाच.

- दाज्या पावरा, माजी उपसरपंच रेवानगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com