Nandurbar zp
Nandurbar zpNandurbar zp

दुर्गम भागातील ग्रामसडक योजनेचे काम दर्जाहीन

दुर्गम भागातील ग्रामसडक योजनेचे काम दर्जाहीन

तळोदा (नंदुरबार) : सातपुड्यातील दुर्गम भाग असलेला धजापाणीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत होणारे काम अतिशय संथगतीने व दर्जाहीन होत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांनी संताप व्यक्त करीत या कामाची गुणवत्ता न सुधारल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. (nandurbar-news-gram-sadak-yojana-work-watch-president-seema-valavi)

धजापाणी (ता. तळोदा) हे सातपुड्याच्या दुर्गम भागात असून, याठिकाणी जाण्यासाठी रस्ते नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मालदापासून ते धजापाणीपर्यंत सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता मंजूर करीत २०१८ च्या फेब्रुवारीत या कामाचे भूमिपूजन केले. दरम्यान, वन विभागाच्या अडचणी आल्याने कामाला उशीर झाला. सुमारे एक वर्षाचा कालावधी उलटला, तरीही रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने व निकृष्ट होत आहे. त्यामुळे धजापाणी व मालदा येथील ग्रामस्थांनी याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांच्याकडे तक्रार केली होती.

Nandurbar zp
पीडित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे

हाताने माती काढून दाखविली

सिमा वळवी व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी करताना एका पुलावरील मोठ्या संरक्षण भिंतीत चक्क माती भरल्याचे दिसून आले. अध्यक्षा सीमा वळवी यांनी स्वतः त्याठिकाणी हाताने माती काढून दाखविली. हे काम पाहून वळवी यांनी संताप व्यक्त करत कामाचा दर्जा सुधारण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या. या वेळी ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याचा आरोप केला. या वेळी बेताब पावरा, गब्बरसिंग पावरा, गोपी पावरा, मगन ठाकरे, अंबुलाल वळवी, हरीश खर्डे, संजय खर्डे, बाळूसिंग पावरा, सचिन राहसे, युवराज वळवी व ग्रामस्थ उपस्थित होते.

एकूण नऊ फरशी पूल, प्रत्यक्षात सहाच

दुर्गम व उंच टेकड्यांवर हा घाटाचा रस्ता असल्याने याठिकाणी डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सहा ठिकाणी फरशी पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात नऊ ठिकाणी फरशी पूल मंजूर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे उर्वरित फरशी पूलही लवकर तयार करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

Nandurbar zp
स्‍टेट बँकेचे एटीएमच लांबविले; चाळीसगाव येथील मध्‍यरात्रीची घटना

सातपुड्याचा दुर्गम भागाला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट व संथगतीने होत असल्याने निश्चितच ही गंभीर बाब आहे. करोडो रुपयांचा निधी मंजूर असणाऱ्या या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना दिल्या असून, त्याची दखल ठेकेदाराने घेतली नाही, तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू.

- सीमा वळवी, अध्यक्षा, जिल्हा परिषद नंदुरबार

संबंधित ठेकेदाराला कामाच्या दर्जाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. ज्या पुलावरील कामाबाबत ग्रामस्थांची तक्रार आहे, त्याठिकाणचे बांधकाम तोडून नव्याने काम करण्याचा सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.

- भूषण चौधरी, अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com