शिक्षक फ्रंटलाईन वर्कर अन्‌ मिळणार विमा संरक्षण

शिक्षक फ्रंटलाईन वर्कर अन्‌ मिळणार विमा संरक्षण
nandurbar zp
nandurbar zpsakal

नंदुरबार : कोरोना कामावरील शिक्षकांना विमा संरक्षण, शिक्षकांना फ्रंन्टलाईन वर्कर (corona frontline worker) म्हणून कुटुंबियांसह लसीकरण, लसीकरणाचा (Corona vaccine) दिवशी पोलिस संरक्षण मिळावे, कोरोनाबाधित शिक्षकांना राखीव बेड, कोरोना सेवा करताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मदत मिळणे आदी मागण्या मान्य करत जिल्हा परिषदेचे (Nandurbar zilha parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी शिक्षकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. (nandrubar zilha parishad school teacher corona frontline worker)

nandurbar zp
कोरोनाने आई गेली..महिनाभरानंतर डॉक्टर मुलाचाही मृत्यू

नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या एकूण १६ संघटनांचा समावेश असणाऱ्या समन्वय समिती प्रतिनिधींची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासोबत नुकतीच झाली. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी उपस्थित होते. कोरोना कालावधीमध्ये जिल्हाभर प्राथमिक शिक्षकांना समक्ष अधिकाऱ्यांचे लेखी आदेश न देता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पत्राचा गैरवापर करून केंद्रप्रमुख शिक्षकांना भयभीत करीत होते. प्राथमिक शिक्षकांना एकाच वेळी दोन-तीन आदेश, मात्र महिला कर्मचारी यांना शाळेत दिवसभर थांबवणे या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया येताच नंदुरबार जिल्ह्यातील सर्व संघटनाच्या समन्वय समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन या कामांचा तीव्र विरोध केला होता. निवेदनाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे यांनी शिक्षक समन्वय समितीचे शिष्टमंडळ चर्चेसाठी बोलाविले होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सुधीर खांदे बैठकीस उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी कोरोना काळात केलेल्या सेवेचे आणि मदतकार्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे आणि उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले. संघटनांकडून गोपाल गावीत, संजय वळवी, पंकज भदाणे, संदिप रायते आदि उपस्थित होते.

मान्य झालेल्या मागण्या

शिक्षक बांधवांच्या विमा संरक्षणाचे प्रस्ताव तातडीने मागवून घेऊन प्रशासन पाठपुरावा करणार, कोरोनाबाधित होऊन मृत झालेल्या शिक्षकांच्या पाल्यांना प्राधान्याने अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्याचे प्रस्ताव शासनाकडे दिले जाईल, कोरोना बाधित शिक्षकांसाठी राखीव बेड ठेवल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण करवून घेणार, तातडीने तसे आदेश दिले जाणार, कोव्हीड कामासाठी एका शिक्षकाला एकच काम आणि तेही तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्या सक्षम अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने आदेश मिळणार. स्लीपा वाटण्याचे काम शिक्षकांना दिले जाणार नाही. शिक्षकांना कामासाठी कालबद्ध किती दिवस काम करायचे याचे आदेश देणार, सुट्टी कालावधीत केलेल्या कामाचे दिवस विशेष रजा म्हणून सेवा पुस्तकांमध्ये नोंद घेण्यासाठी मार्गदर्शन मागवणार, दुर्धर आजाराने ग्रस्त, दिव्यांग, स्तनदा माता यांना कामातून वगळणार, लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी गावातील हायस्कूल व जि.प.शिक्षकांकडे, आपल्या शिक्षक बांधवांवर नियंत्रण आपल्या यंत्रणेचे राहील. ग्रामसेवक किंवा तलाठी यांचे नियंत्रण असणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com