esakal | नवापूरमध्ये प्रथमच सुरू झाली ऑक्‍सिजन ॲम्‍बुलन्स

बोलून बातमी शोधा

oxygen ambulance

नवापूरमध्ये प्रथमच सुरू झाली ऑक्‍सिजन ॲम्‍बुलन्स

sakal_logo
By
टिम इ सकाळ

नवापूर (नंदुरबार) : शहरात पहिली ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी सदर रूग्‍णवाहिका उपलब्ध करून दिली. तालुक्यात अद्याप शासकीय अथवा खाजगी ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र आता कोरोना बाधित रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना या रुग्णवाहिकेमुळे मोठी मदत होईल.

नवापूर पालिकेचे उपनगराध्यक्ष जय महाकाल सेवा भावी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास बडोगे यांनी ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून दिली. कोरोनाच्या संकटात कोरोना बाधित रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासू लागल्यावर उपचारासाठी शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका नव्हती. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात, पालिकेच्या किंवा खाजगी दवाखान्यात ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका नव्हती. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेसाठी धावपळ होत होती. ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेता उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी जय महाकाल सेवा भावी बहुउद्देशीय संस्थेचे रुग्णवाहिकेस ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली.

संपर्क साधण्याचे आवाहन

श्री बडोगे यांनी कोरोनाच्या संकटात संपूर्ण देशात ऑक्सिजनची कमतरता भासत असतांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून नवापूर वासीयांसाठी ऑक्सिजनचे दोन जम्बो सिलेंडर आणि ऑक्सिजनची सुविधा असलेली अॅम्‍बुलन्सची सेवा उपलब्ध करून दिली आहे. नवापूर शहरातील जनतेला त्यांनी आवाहन केले आहे की गोरगरीबासाठी अंबुलन्स व ऑक्सिजनची सुविधा केली असून ९०२२४४९८४६ क्रमांकावर संपर्क करण्याची विनंती केली आहे.