esakal | शहादा चौफुलीवर अपघात; एकाचा मृत्‍यू, एक गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

accident

मोटरसायकलवरील दोघा युवकांच्या कानाला, डोक्‍याला जबर मारहाण लागली. त्‍यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

शहादा चौफुलीवर अपघात; एकाचा मृत्‍यू, एक गंभीर

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : शहादा प्रकाशा रोडलगत शिरूड चौफुलीजवळ ट्रक मोटरसायकलची जोरदार धडक झाल्याने त्यात एका युवकाच्या मृत्यू झाला. तर दुसऱ्यास जबर मार लागल्याने सुरत येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सदर अपघात शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. 
प्रकाशाहुन शहाद्याकडे मालवाहू ट्रक (क्र. जिजे 01, सिटी 1339) भरधाव वेगाने येत असताना शिरुडकडून दुचाकी (क्रमांक एमएच. 39, पी. 6963) शहरातील कुकडेल भागात जात असताना चौफुलीवरील रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या जड वाहनास मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात मोटरसायकलवरील दोघा युवकांच्या कानाला, डोक्‍याला जबर मारहाण लागली. त्‍यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु अपघातात पुरुषोत्तम हिरामण पाटील (वय 46, रा. गांधी चौक, शहादा) तसेच विलास लिमजी पाटील (वय 50, रा. मलोणी, ता. शहादा) यांच्या हातापायाला व डोक्याला जबर मार लागला. घटनेचे वृत्त कळताच शहरातील गुजर गल्लीतील अनेक युवा घटनास्थळी धावून आले. 

उपचारादरम्‍यान एकाचा मृत्‍यू
दरम्यान पुरुषोत्तम पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने रात्रीच धुळे हलवण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मावळल. रविवारी सकाळी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात डॉ. अल्लाउद्दीन शेख यांनी मयताचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर विलास पाटील या युवकावर शहादा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्‍याला आज सकाळी सुरत येथे खासगी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले.

संपादन ः राजेश सोनवणे