esakal | काटेरी झुडूपात उभारली ओपन जिम
sakal

बोलून बातमी शोधा

open gym

काटेरी झुडूपात उभारली ओपन जिम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तळोदा (नंदुरबार) : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी लावण्यात येणारे ओपन जिमचे साहित्य चक्क काटेरी झुडपांच्या आजूबाजूला लावले आहे. नगरपालिकेने (Taloda nagarpalika) साहित्य बसवताना कोणतीही साफसफाई न करता साहित्य बसवले असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे साहित्य बसवून साहित्यासाठी लागलेला पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. सदर साहित्य लवकरात लवकर योग्य ठिकाणी बसवावे अन्यथा शिवसेना (palika shiv sena member jitendra dube) ते सर्व साहित्य उखडून योग्य ठिकाणी लावेल; असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी दिला आहे. (nandurbar-news-taloda-nagar-palika-open-gym-stand-open-space)

तळोदा नगरपालिकेला आदिवासी उपयोजनेतून (Tribal deployment scheme) सन २०१९-२० या वर्षासाठीच्या योजनेतून ओपन जिमचे (taloda palika develop open gym) साहित्य देण्यात आले आहे. हे साहित्य शहरात असलेल्या कॉलनी अंतर्गत ओपन स्पेसमध्ये बसविले जात आहे. मात्र तापीमानगरमधील ओपन स्‍पेसच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वॉल कंपाऊंड नाही किंवा सिमेंटचे तारयुक्त असे कंपाउंड देखील नाही. ज्या ठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी काटेरी झुडपांची अडचण आहे; तेथेच हे साहित्य बसवण्यात आले आहे. तिच गत सिताई राजकुळेनगर येथे बसवण्यात आलेल्या साहित्याची झाली आहे. तेथे देखील सर्व साहित्य काटेरी झुडपांनी वेढलेले आहे.

काटेरी झुडपात लावण्याचे कारण समजेना

कोणाच्या मेहरबानी मुळे अशा प्रकारचे कार्य होत आहे व पालिका प्रशासन झोपलेले आहेत काय असा प्रश्न शहर शिवसेनेने विचारला आहे. ज्या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये मोठमोठे काटेरी झुडपे आहेत. त्या ठिकाणी हे साहित्य का लावण्यात आले? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेलाही पडला आहे. परंतु, पालिका प्रशासन डोळे बंद करून असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दुसरीकडे साफसफाई न करता जीमचे साहित्य बसवण्याचा अट्टाहास करणाऱ्या ठेकेदारावर पालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.तर सुदृढ आरोग्यासाठी सोय होत असताना पाकिकेने केलेल्या दुर्लक्षावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: गांधी टोपीची कमाल..दुर्गम भागातही वाढला लसीकरणाचा टक्‍का

पुण्याच्या कंपनीशी ठेका

ओपन जीमचे साहित्य बसवण्यासाठी पुणे स्थित एका खाजगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. त्यामुळे तेथील ठेकेदाराशी समन्वय साधून ओपन जीमचे साहित्य व्यवस्थितरित्या बसवून घेणे आवश्यक होते. मात्र साहित्य बसविण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

काटेरी झुडपे न काढता अडचणीच्या ठिकाणी जीमचे साहित्य बसवण्यात आले आहे. पालिकेने ओपन जीमचे साहित्य योग्य ठिकाणी साफसफाई करून लावावे अन्यथा शिवसेना ते साहित्य उखडून योग्य ठिकाणी लावेल.

- जितेंद्र दुबे, शहर प्रमुख, शिवसेना