मुंबईत विमानाला स्लॉटबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

जळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या "ट्रु जेट' कंपनीला कंत्राट देणे यासह विविध निर्णय आज येथे प्रथमच झालेल्या विमान उड्डाण सेवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आले. 

जळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या "ट्रु जेट' कंपनीला कंत्राट देणे यासह विविध निर्णय आज येथे प्रथमच झालेल्या विमान उड्डाण सेवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आले. 
विमान सल्लागार समितीची पहिलीच बैठक आज झाली. त्यात खासदार ए. टी. पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य किशोर राजे निंबाळकर, संयोजक विमान उड्डाण निदेशक अधिकारी विकास चंद्र, सदस्य- उद्योजक अतुल जैन, उद्योजक प्रेम कोगटा (व्यापार), श्‍यामकांत पाटील (टुरिझम), सदस्य व केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आदी उपस्थित होते. 

विमानाची धावपट्टी आता 1700 मीटर आहे ती 3600 मीटरपर्यंत वाढविण्याबाबत निर्णय झाला. त्यासाठी अडचणी काय काय आहेत त्याची माहिती घेऊन त्यावर तातडीचे उपाय करण्याचे ठरविण्यात आले. एअर डेक्कन कंपनीने विमान सेवा सुरू केली, मात्र ती बंद पडली. आता नियमितपणे विमान सेवा देवू शकणाऱ्या "ट्रु जेट' किंवा यासारख्या कंपनीला कंत्राट देण्याबाबत निर्णय झाला. प्रवाशांना सोयी सुविधा देण्यासाठी विविध उपाय करण्याचे ठरविण्यात आले. 

दोन महिन्यात "नाईट लॅंडींग' 
जळगाव येथे औरंगाबादपेक्षा अधिक आकर्षक सुसज्ज विमानतळ तयार करून दोन महिन्यात रात्रंदिवस विमानसेवा सुरू करण्याबाबत योग्य ती पाऊले विमान प्राधिकरणाचे उचलण्याचे आदेश देण्यात आले. विमानतळातील धावपट्टी वाढविण्यासाठी अडचणीचा ठरणारा रस्ता, नाला, विजेचे खांब, जलवाहिनी याबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

Web Title: marathi ne ws jalgaon eroplane slot mumbai jalgaon