मलवाहिका दुरुस्तीचा ठेका  पाच वर्षांसाठी देण्याची तयारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

नाशिक : शहरात विकासकामे व प्रकल्पांची देखभाल- दुरुस्ती करताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामाची गरज, तांत्रिक व्यवहार्यता व उपलब्ध निधी या त्रिसूत्रींच्या आधारे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मलवाहिकांच्या देखभाल- दुरुस्तीचे काम पाच वर्षांसाठी देण्याची तयारी झाली. आयुक्तांकडूनच 73 कोटी 35 लाखांचा प्रस्ताव आचारसंहिता संपुष्टात येताच महासभेसमोर ठेवला जाणार आहे. 

महापालिकेने दोन वर्षांपूर्वी घंटागाडीचा ठेका पाच वर्षांप्रमाणेच दिला. त्यानुसार दर वर्षी मलवाहिका दुरुस्तीसाठी खर्च करण्यापेक्षा पाच वर्षांसाठी एकदाच ठेका देण्याचे नियोजन करण्यात आले. शहरासाठी महापालिकेने मलनिस्सारण आराखडा तयार केला असून, त्यात आठ सिवरेज झोन तयार केले आहेत. त्यापैकी चार सिवरेज झोन कार्यान्वित करण्यात आले असून सर्व चालू सिवरेज झोनची क्षमता 342 दशलक्ष लिटर आहे.

सध्या गंगापूर सिवरेज झोनमध्ये 18 एमएलडी क्षमतेचे 28.89 कोटींचे, तर पिंपळगाव खांब येथे 32 एमएलडी क्षमतेचे 55.28 कोटींचे मलनिस्सारण केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. भविष्यात वाढत्या लोकसंख्येनुसार मखमलाबाद व कामटवाडा सिवरेज झोन विकसित केले जाणार आहेत. शहरात एक हजार 593 किलोमीटर लांबीच्या मलवाहिका आहेत. या मलवाहिकांद्वारे शहरातील सांडपाणी मलनिस्सारण केंद्रांमध्ये संकलित केले जाते.

    सुमारे 280 दशलक्ष लिटर सांडपाणी मलनिस्सारण केंद्रात जमा होते. त्यावर प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. मलवाहिकांमधून सांडपाणी संकलित करताना दर वर्षी त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असते. दुरुस्ती न केल्यास मलवाहिका तुंबून ते पाणी रस्त्यावर येण्याची शक्‍यता असते. आतापर्यंत ठेकेदारामार्फत दर वर्षी देखभाल- दुरुस्तीचे काम केले जाते.

  सिवरेज झोननुसार ठेकेदारांची नियुक्ती होते. परंतु आता देखभाल- दुरुस्तीच्या कामाचा एकत्रित ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाच वर्षांसाठी कंत्राट दिले जाणार आहे. देखभाल- दुरुस्तीसाठी दर वर्षी 14.67 कोटींचा खर्च अपेक्षित असून, पाच वर्षांसाठी एकत्रित 73.36 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. 

Web Title: marathi new sevrage plant