गणेश विसर्जनाची धुम,भक्तांचा उत्साह,ढोलपथक,कसरतींनी वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नाशिक : नाशिक मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीस वाकडी बारव येथून प्रारंभ झाला. .पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे,महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, 

नाशिक : नाशिक मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीस वाकडी बारव येथून प्रारंभ झाला. .पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे,महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, 
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेटे, माजी महापौर विनायक पांडे,विरोधी पक्ष नेत्या हेमलता पाटील, गजानन शेलार आदी उपस्थित होते. या मिरवणुकीत २१ मंडळांचा सहभाग आहे. नाशिकच्या पंचवटी,सिडको,कॉलेजरोड,सातपूर,नाशिकरोड अशा सर्वच भागात भक्तांचा अपुर्व उत्साह पहायला मिळत आहे. गणपती बाप्पा मोरयां या जयघोषणाच्या जोडीलाच कसरतींनी लक्ष वेधले आहे. मुर्ती दान करण्यातही भाविक आघाडी आहे. सामाजिक मंडळ,महापालिकेने मुर्तीदानाची सर्वत्र सोय केलेली आहे. 
दोन हजार पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, प्रदीप जाधव उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi new viserjan