नाशिक जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा संपन्न

रोशन खैरनार
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

सटाणा : नाशिक जिल्हा बालरोगतज्ज्ञ (आय.ए.पी.) संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.जयंत रणदिवे तर सचिवपदी सटाणा येथील प्रख्यात बालरोगतज्ञ व आय.एम.ए.चे सचिव डॉ.अमोल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक येथे आयोजित पदग्रहण सोहळ्यात ही निवड झाली.

सटाणा : नाशिक जिल्हा बालरोगतज्ज्ञ (आय.ए.पी.) संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.जयंत रणदिवे तर सचिवपदी सटाणा येथील प्रख्यात बालरोगतज्ञ व आय.एम.ए.चे सचिव डॉ.अमोल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक येथे आयोजित पदग्रहण सोहळ्यात ही निवड झाली.

नाशिक येथील एस.एस.के. सॉलीटेअर हॉटेलमध्ये नाशिक जिल्हा बालरोगतज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.जयंत रणदिवे यांनी संघटनेच्या मावळत्या अध्यक्षा डॉ.सौ.संगीता बाफना यांच्याकडून, नवनिर्वाचित सचिव डॉ.अमोल पवार यांनी मावळते सचिव डॉ.अमित पाटील यांच्याकडून तर डॉ.प्रकल्प पाटील यांनी मावळते खजिनदार डॉ.ऋषिकेश कुटे यांच्याकडून कामकाजाची सूत्रे स्वीकारली.

यावेळी जिल्हा संघटनेतर्फे नूतन अध्यक्ष डॉ.रणदिवे व नूतन सचिव डॉ. पवार यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सचिव डॉ.पवार यांनी आपल्या कार्यकाळात कुपोषणासह विविध सामाजिक, सेवाभावी आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेच्या केंद्रीय स्तरावरील पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ.केडे मालवणकर, राज्यशाखेचे सचिव डॉ.सागर सोनवणे, खजिनदार डॉ.सदाचार उजलंबकर, डॉ.प्रवीण भांब्री, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.पंकज गाजरे, डॉ.नितीन सुराणा, डॉ.संजय आहेर आदींसह जिल्ह्यातील बालरोगतज्ञ व मान्यवर उपस्थित होते. 

डॉ.अमोल पवार यांच्या निवडीबद्दल डॉ.सुभाष काश्यपे, डॉ.मोहन टेंबे, डॉ.जे.एस.पटेल, डॉ.नारायण सूर्यवंशी, डॉ,चंद्रकांत सुरवसे, डॉ.राजेंद्र कुलकर्णी, डॉ.राजेंद्र गायकवाड, डॉ.योगेश भदाणे, डॉ.मिलिंद भराडीया, डॉ.रवींद्र सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे. 

Web Title: Marathi newa nashik news child specialist doctors