जिल्हयात १०८ वरील डॉक्टर संपावर,डॉक्टर विनाच धावताहेत ४७ रुग्णवाहिका

हर्षल गांगुर्डे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

गणुर-(नाशिक) अपघातातील जखमी असो वा प्रसुती माता यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर संपावर गेल्याने आज नाशिक जिल्ह्यातील ४७ रुग्णवाहिका या डॉक्टर विनाच धावतांना दिसत आहेत.

     १०८ वरील डॉक्टर्सच्या मासिक पगारात कुठलीही पूर्वसूचना न देता कपात केल्याने नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर्स यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता रुग्णांना नवसंजीवनी ठरणारी १०८ रुग्णवाहिका डॉक्टर्स विना धावत असल्याने पीडितांचे हाल होणार असून अप्रिय घटना घडण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. एकीकडे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असताना दुसरीकडे अत्यावश्यक सेवा सुरळीत नसल्याने नागरिकांचा रोष वाढण्याची दाट शक्यता आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news १०८ ambulance