Independence Day पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन,सांस्कृतिक कार्यक्रम,पुरस्कार सोहळ्याने रंगत

अंबादास शिंदे
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नाशिकरोडः भारतीय स्वतंत्र्याच्या ७१ व्या वर्धाफण दिना निमित्त विभागीय महसुल अायुक्त कार्यालयात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सांस्कृतिक कार्यक्रम,सत्कार सोहळा यामुळे रंगत आली..

नाशिकरोडः भारतीय स्वतंत्र्याच्या ७१ व्या वर्धाफण दिना निमित्त विभागीय महसुल अायुक्त कार्यालयात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सांस्कृतिक कार्यक्रम,सत्कार सोहळा यामुळे रंगत आली..

यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप,योगेश घोलप, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या संचालिका अस्वती दोरजे, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते,अादि उपस्थित होते. 
   शुभेच्छा देतांना पालकमंत्री  महाजन म्हणाले, सलोखा, समाजात कायदा सुव्यवस्था  राखण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावा. यावर्षी सुरवातीला पाऊस चांगला झाला त्यामुळे शेतक-यांनी प्रेरणा केल्या .,पण अाता पावसाने दाडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले अाहेत पुणे व कोकणांत भागातील धऱणे चांगल्या प्रामणात भरली आहे. उर्वरित ठिकाणी धरणेसुध्दा भरले नाहीत. त्यामुळे पाण्याची टंचाई भासत अाहे. त्यासाठी पिण्याचे पाण्याचे नियोजन केले जाईल. नद्या नाल्या कोरड्या आाहेत.

घरकुल योजना अमंलबजावणीत जिल्हा अव्वल
ते म्हणाले,घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रथम क्रमांकावर असून ग्रामीण भागात विविध घरकूल योजनांच्या माध्यमातून २१ हजार कुटुंबांना घरकूल उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या काळात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे,  

यावेळी पुर्वमाध्यामिक शिष्यवृत्ती परिक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा, स्मार्ट ग्रामपंचायत, राष्ट’संत तुकोडाजी महाराज स्पर्धा अंतर्गत पुरस्कार,राष्ट्रपती पदक पोलीस,. पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण कार्यालय अायएसअो प्रमाणपत्र पुरस्कार वितरण पालक मंत्र्यांचे हस्ते झाले.. तसेच जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळाचे चे अनावरण अाणि युवा माहिती दूत शुभारंभही पालकमंत्र्यांचा हस्ते झाला.

Web Title: marathi news 15augest program