स्त्री शक्तीची वज्रमुठ आवळल्यास  काहीही अशक्य नाही-आदेश बांदेकर

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मालेगाव : स्त्री शक्तीची वज्रमुठ आवळल्यास दारुबंदी, व्यसनमुक्तीच नव्हे तर कुठलीही गोष्ट महिलांना अशक्य नाही. महिला कुटुंबांच्या आनंदासाठी रात्रंदिवस झटतात. तुम्ही स्वत:साठीही वेळ काढा. हसत-खेळत, आनंदी रहा. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटीबध्द आहे. तुमच्यात आणि प्रशासनातील दुवा म्हणून हा संवाद काम करेल. आगामी काळात स्थानिक महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष, तथा शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी गुरुवारी (ता.२२) येथे केले. 

येथील ऐश्‍वर्या मंगल कार्यालयात शिवसेना महिला आघाडीतर्फे झालेल्या ‘माऊली संवाद’ या कार्यक्रमात महिलांना आनंदी करतानाच स्त्री शक्तीची ओळख करुन देत त्यांनी संवाद साधला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, तालुकाप्रमुख संजय दुसाने आदी या वेळी उपस्थित होते. श्री. बांदेकर यांनी महिलांना प्रथमच दिलखुलासपणे बोलण्याचे आवाहन केले. तुम्ही तुमचे दु:ख विसरावे, आनंदाने झुलावे. राज्यात प्रत्येक माऊली घरंघर आनंदी झाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. तुमचे प्रश्‍न, समस्या जाणून घेऊन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून ते साेडविण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.

संवाद कार्यक्रमात शुभांगी निकम, लता सोनवणे, संगिता माहेश्वरी, भारती चौधरी, संगिता थोरात, जयश्री जोशी, लिलाबाई वाघ, सोनाली निकम, मंगला शेलार, विशाखा ठाकरे, शामल सुरते आदी महिलांनी राज्यात व्यसनमुक्ती व्हावी, आमच्या मुलांना रोजगार मिळावा, शासनाने दारुबंदी करावी, अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षिकांचे प्रश्‍न सोडवावेत. जिल्हा निर्मिती व्हावी. नार-पार प्रकल्प मार्गी लावावा. रेल्वेचे काम वेगाने व्हावे, औद्योगिक वसाहतीत उद्योग यावेत. स्थानिक मालाला बाजारपेठ मिळवून द्यावी. शहर अतिक्रमणमुक्त करावे. या प्रश्‍नांसह स्थानिक गटार, रस्ते, अतिक्रमण, स्वच्छता यावरही महिलांनी भरभरुन प्रश्न उपस्थित केले.

श्री. भुसे यांनीही महिलांच्या काही प्रश्‍नांची उत्तरे दिली. त्यांच्या कामाचे श्री. बांदेकर यांनी कौतुक केली. कार्यक्रमास महिला आघाडीच्या संगिता चव्हाण, अनिता भुसे, नगरसेविका ज्योती भोसले, आशा अहिरे, कल्पना वाघ, जिजाबाई पवार, कविता बच्छाव, पुष्पा गंगावणे, छाया शेवाळे, मनिषा धात्रक, मुंबईच्या किशोरी पेडणेकर, यामिनी जाधव आदींसह बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

आईच्या स्मृती जाग्या झाल्या
आज सकाळी माझ्या वडिलांचा फोन आला. त्यांनी आदेश तू आता कोठे आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी मी त्यांना मालेगावी असल्याचे सांगताच त्यांना एका जुन्या आठवणीचे स्मरण करुन दिले. मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे सन १९६१ मध्ये नर्स म्हणून तुझ्या आईची पहिली पोस्टींग झाली होती. तिने तेथे दोन वर्षे सेवा केली. मी तेव्हा अलीबागला होतो असे त्यांनी सांगितले. आज आई मला सोडून गेली आहे. मात्र येथे भेट देऊन आईच्या स्मृती जाग्या झाल्या. तिच्या रुपाने मला असंख्य माऊलींचे दर्शन झाले असे आदेश बांदेकर म्हणाले. कार्यक्रमात महिलांना त्यांनी झिंगाट गाण्यावर ताल धरायला लावा. महिला आनंदाने नाचल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aadesh bandekar