आदिवासी विद्यार्थ्यांचा 'अन्नत्याग' 

aadivashi student.
aadivashi student.

चोपडा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल विभागाकडे अनेक महिन्यापासून मागणी करूनही न्याय मिळत नाही. या पार्श्वभूमीवर धनवाडी रस्त्यावरील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून अन्नत्याग करून धरणे आंदोलन सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असून, तो निष्फळ ठरल्याने हे आंदोलन सुरूच आहे. 
ड्रेस कोड, डीबीटी निर्वाह भत्ता मिळत नसल्याने आंदोलन सुरू केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. सायंकाळी सहाला यावल प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी पवन पाटील आले. मुलांनी मागण्यांबाबत संताप व्यक्त करून व्यथा मांडली. चोपड्याच्या आदिवासी मुलांकडे यावल प्रकल्प कार्यालय नेहमी दुर्लक्ष करून आमच्या मागण्यांकडे लक्ष घालत नाही. आम्हांला वारंवार असे आंदोलन करावे लागत असल्याचा तीव्र शब्दात पवन पाटील यांच्यासमोर मुलांनी संताप व्यक्‍त केला. पवन पाटील हे नव्याने प्रकल्प कार्यालयात रुजू झाल्याने त्यांनी आपल्या समस्या मी वरिष्ठाकडे मांडतो असे सांगून आपण अन्नत्याग करू नका असे आवाहन केले. मात्र, आमच्या मागण्या जोपर्यत पूण होत नाही. तोपर्यंत आमचे भोजन बंद (अन्नत्याग) आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा त्यांनी घेतला. आदिवासी विकास परिषद ग्रामीण तालुकाध्यक्ष नामसिंग पावरा, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचे रमूद पावरा, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचे प्रवीण पावरा, तसेच पिंटू पावरा, अजय पावरा, आकाश पावरा, सुनील पावरा, शरद पावरा, आनेश बारेला, साजन पावरा, कालुसिंग बारेला, करण बारेला आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 


तीन महिन्यांपासून दुर्लक्ष 
आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या तीन चार महिन्यांपासून डीबीटी निर्वाह भत्ता, ड्रेस कोडची रक्कम अजूनपर्यंत मिळाली नसून संबंधित वसतिगृह गृहपाल एस. खंबाईत यांना वारंवार मागणी करून आमचा समस्या सुटत नाही. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com