दहा एक्‍स आयर्नमन डेका युके'  स्पर्धेसाठी अम्मार मियाजी पात्र 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नाशिक : इंग्लडच्या यॉर्क सिटी येथे 21 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या "10 एक्‍स आयर्नमॅन डेका युके-2019' या र्स्प्धेसाठी नाशिकचा अम्मार मियाजी पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी पात्रता मिळवणारा अम्मार हा भारतातील पहिला खेळाडू आहे. स्पर्धा निवडी व इतर बाबींची माहिती त्याने नाशिक जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परीषदेत दिली. 

चौतीस वर्षीय अम्मार मियाजी हा टेबल टेनिसचा राष्ट्रीय खेळाडू आहे. त्यानंतर त्याला सायकलींगची गोडी निर्माण झाली. आणखी वेगळे काही तरी करण्याच्या ध्यासातून त्याने वेगळ्या साहसी उपक्रमात सहभाग घेण्यास सुरवात केली. 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेविषयी अम्मार मियाजी म्हणाला, की ही स्पर्धा सर्वात मोठी अल्ट्रा ट्रायथलॉन स्पर्धा आहे.

आंतरराष्ट्रीय अल्ट्रा ट्रायथलॉन असोसिएशन आणि डेका यु.के. इंग्लंड यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी होतांना 38 किलोमीटर पोहणे (24 तासांत), 1 हजार 800 किलोमीटर सायंकलींग (चार दिवसांत), 425 किलोमीटर धावणे (सहा दिवस) असे एकूण बारा दिवसांत ही स्पर्धा पूर्ण करायची आहे. स्पर्धेसाठी अम्मारच्या संघात डॉ.वैभव महाजन, सचिन गलांडे, विलास इंगळे, विजय काकड, मुफद्दल रामपूरवाला, दूर्षत उस शरफ रामपूरवाला यांचा समावेश आहे. दरम्यान उपक्रमासाठी सुमारे चाळीस लाख रूप्ये खर्च येणार आहे. संस्थांनी अर्थसहाय्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत नवीन विक्रम नोंदविणार असल्याचा विश्वास अम्मारने पत्रकार परीषदेत व्यक्‍त केला. यावेळी नाशिक जिमखानाचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, अविनाश खैरनार आदींच्या उपस्थितीत त्याचा सत्कार करून स्पर्धेत यशस्वीतेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aamer miyaji