लष्कराच्या ताफ्यात लवकरच आधुनिक "अपाचे' 

विनोद बेदरकर
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

 नाशिक ः लष्करी हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर समाविष्ट होणार आहे. त्यामुळे हवाई दलासोबतच तोफखान्याच्या कॉम्बट ऍव्हिएशनची घातक क्षमता वाढणार आहे. दरम्यान, आज भारतीय लष्कराचे सुप्रीम कमांडर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यानिमित्त "कॅट'च्या तळावर प्रथमच रुद्र लढाऊ हेलिकॉप्टरचे दर्शन घडले. 

 नाशिक ः लष्करी हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर समाविष्ट होणार आहे. त्यामुळे हवाई दलासोबतच तोफखान्याच्या कॉम्बट ऍव्हिएशनची घातक क्षमता वाढणार आहे. दरम्यान, आज भारतीय लष्कराचे सुप्रीम कमांडर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यानिमित्त "कॅट'च्या तळावर प्रथमच रुद्र लढाऊ हेलिकॉप्टरचे दर्शन घडले. 

युद्ध, शांतता काळात लष्कराच्या एव्हिएशन विभागाने आजपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दलाच्या कामगिरीचा गौरव गुरुवारी (ता. 10) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करड्या रंगातील निशाण (ध्वज) देऊन करण्यात आला. गांधीनगरच्या कॉम्बॅक्‍ट आर्मी एव्हिएशन स्कूलच्या मैदानावर हा सोहळा रंगला. सोहळ्यात गांधीनगरच्या तळावर ध्रुव, चिता, चेतक आणि रुद्र हेलिकॉप्टरने सरसेनापतींना मानवंदना दिली. मानवंदनेच्या निमित्ताने दर्शन घडलेल्या रुद्र या घातक लढाऊ हेलिकॉप्टरला पाहायला लष्करी जवानांत उत्सुकता दिसली. कार्यक्रमात रुद्र लढाऊ हेलिकॉप्टर पहिल्यांदा सादर झाले. 
अपाचे हेलिकॉप्टरकडे लक्ष 
युद्धभूमीवर लष्कर विशिष्ट रंगाचा ध्वज घेऊन लढते. जेव्हा एखादा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतो. विविध पातळ्यांवर मुर्दुमकी गाजवतो, त्या वेळी राष्ट्रपतींकडून त्या विभागाला निशाण देऊन सन्मानित करण्याची परंपरा आहे. प्रत्येक विभागाला एकदाच हा बहुमान मिळतो. निशाण म्हणजे त्या दलाची ओळख बनते. आज अशाच महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्त निशान मिळालेल्या "कॅट'ला अपाचे हे लढाऊ हेलिकॉप्टर मिळणार आहे. शत्रूवर तुटून पडण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक अपाची हेलिकॉप्टरही लवकरच या तळावर दाखल होण्याची शक्‍यता आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ही चर्चा होती. अत्याधुनिक अपाची या लढाऊ हेलिकॉप्टरमुळे खऱ्या अर्थाने तोफखान्याच्या एव्हिएशन विभागाची क्षमता वाढणार असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

एव्हिएशनचे वाढते महत्त्व 
युद्धकाळात तोफखान्याला दरवेळी हवाई दलावर विसंबून राहणे शक्‍य नसते, अशा स्थितीत जगातील मोठ्या राष्ट्रांनी लष्करात स्वतंत्र छोटेखानी हवाई तुकड्या (एव्हिएशन) निर्मिती केली. देशात एक हजार 986 तोफखान्यात हे स्वतंत्र दल स्थापन झाले. गांधीनगरला कॉम्बॅट एव्हिएशनचा तळ आहे. या दलाकडे चिता, चेतक, हलक्‍या वजनाचे ध्रुव, लान्सर ही हेलिकॉप्टर आहेत. पण आज "रुद्र'चे दर्शन घडले. तोफखान्याचे निरीक्षण, युद्धभूमीवरून जखमी सैनिकांना वाहून नेणे, सैनिकांना सीमावर्ती भागात पोचवणे, हवाईमार्गे रसद पुरवठा, अपत्कालीन मोहिमेत बचावाची जबाबदारी पार पाडली जाते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aapache