मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले वीस जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

अंबासन ( जि.नाशिक)- मालेगाव तालुक्यातील मोरदर येथे सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान खाकुर्डीहून निमशेवडी येथे मजूरांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात तब्बल वीस मजूर जखमी झाले आहेत.

अंबासन ( जि.नाशिक)- मालेगाव तालुक्यातील मोरदर येथे सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान खाकुर्डीहून निमशेवडी येथे मजूरांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात तब्बल वीस मजूर जखमी झाले आहेत.
     निमशेवडी (ता.मालेगाव) येथील मजूर नेहमीप्रमाणे मोलमजुरीसाठी खाकुर्डी येथे कांदा काडणीसाठी गेले. काम आटोपल्यानंतर सायंकाळी परतीच्या मार्गावर असतांना मोरदरजवळ वाहन (क्र. एमएच. ४१,एजी.२७२२) यावरील चालक अजय भगवान मासुळ (वय१९) याचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. या वाहनात वीस मजूर प्रवास करीत होते. चालकाने मद्यप्राशन केले असल्याचे सांगितले जाते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना वडणेर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र येथे वैद्यकीय आधिकारी डाँ.मनिषा मोहीते या हजर नसल्याने. काही जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

जखमी मजुरांची नावे अशी.
 अस्तोवर चंतुर पाटिल (वय३०)

,उज्जेन शंकर चोपडे (वय४५),दामू रामा माळी (वय५५)

 जयवंताबाई संपत आहिरे (वय५५),सरलाबाई कैलास गांगुर्डे (वय१८)

,सिंधूबाई भालचंद्र सोनवणे (वय६०),सुभाष लक्ष्मण कन्नोर (वय५०),अनिता सुनिल माळी (वय२६)
,सुनिल दामू माळी (वय३०),अशोक भिमाजी कोळपे (वय३३),मायाबाई अशोक कोळपे (वय३०)

,अजय भगवान मासुळ (वय १९) चालक,संगिता रोहीदास कन्नोर (वय४५)
,भाऊसाहेब गिरीधर मासूळ (वय३५),वैशाली भाऊसाहेब मासूळ (वय३०)
,निला विश्वास माळी (वय३०)
, बायटा विलास माळी (वय२५)

अन्य जखमी खाजगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे नाव कळू शकली नाहीत.

 

Web Title: marathi news accident