चांदवडला अपघातात तरुण ठार;तरुणी गंभीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

गणुर:- चांदवड तालुक्यातील राहुड धरणाजवळ आज मोटारसायकल अपघात होऊन तरुण जागीच ठार तर तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना दुपारी घडली.
चांदवड कडून मालेगाव च्या दिशेने जातांना मोटारसायकल चा अज्ञात वाहनासोबत अपघात झाला. या अपघातात तरूणाच्या अंगावरून ट्रक चे टायर गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून यात गौतम जगताप (वय २९) हा तरुण जागीच ठार झाला तर रोहिणी पवार ही तरुणी जखमी झाली आहे. तिच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघेही सटाणा तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news accident