अपघातग्रस्तांच्या मदतीला धावला चिन्मय 

live
live

नाशिक : रात्रीच्या वेळी झालेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीला कोणीही येत नसताना, शुटिंग करून परतणाऱ्या चिन्मय उद्‌गीरकर मात्र धावून आला. त्याने स्वत:च्या कारमधून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्या या माणुसकीची दखल पोलीस आयुक्तालयाने घेत, त्याचा आज गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रामाणिक रिक्षाचालकांनाही सन्मानित करण्यात आले. 

    घोटी-सिन्नर बायपास रस्त्यावर गेल्या 23 तारखेला रात्री एका अवजड वाहनाने कार आणि दुचाकीचा धडक दिल्याने अपघात झाला होता. यामध्ये दुचाकीवरील युवक आणि कारमधील महिला जखमी झाले होते. रात्रीची वेळ असल्याने ते मदतीसाठी अनेकांकडे याचना करीत होते परंतु जा-ये करणारे वाहनचालक मोबाईलमध्ये फोटो काढत होते परंतु मदतीसाठी कोणीही आले नाही. त्याचवेळी मूळचा नाशिकचा असलेला अभिनेता चिन्मय उद्‌गीरकर हा शिर्डीहून त्याचे दिवसभराचे शुटिंग आटोपून मुंबईकडे त्याच मार्गाने जात होता.

     अपघाताची घटना पाहताच तो थांबला आणि त्याने दोघा जखमींना आपल्या कारमधून नजिकच्या रुग्णालयात पोहोचविले. यातील एकजणाला वेळीच उपचार न मिळाल्याने दगावले. पण त्याचवेळी एकाचे प्राणही वाचविले. त्यावेळी त्याने तात्काळी पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना संपर्क साधून घटनेची माहितीही दिली. त्यामुळे नजिकच्या पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. 

   चिन्मय उदगीरकर याच्या या माणुसकीच्या जबाबदारीचे आज पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कौतूक करण्यासाठी त्याचा आयुक्तालयात सन्मान केला. तसेच, पंचवटी व भद्रकालीतील दोन घटनांमध्ये रिक्षामध्ये राहिलेले प्रवाशांचे सामान त्यांना परत करीत प्रामाणिकपणा दाखविला. त्याबद्दल रिक्षाचालक संजय धोंगडे, राजू शिंदे आणि पोलीस मित्र राकेश वाघ यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी पोलीस आयुक्तालयाने निरीक्षणगृहातील विद्यार्थी चिराग वाल्मिक याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. याप्रसंगी उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह पोलीस निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com