विविध मागण्यांसाठी आदिवासी सेनेचे धरणे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नाशिक ः आदिवासीच्या वनजमीनीविषयक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत. याप्रमुख मागणीसाठी आदिवासी सेनेतर्फे नाशिकला निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी 
कार्यालयात काही वेळ धरणे धरीत, आंदोलकांनी त्यांच्या मागण्या मांडल्या. 
आदिवासीच्या वनजमीनीचे प्रलंबित प्रकरण त्वरीत मार्गी लावावीत. जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयाच्या अखत्यारितील वनजमीनी विषयक प्रकरणाचा आढावा घेउन 
त्यावर कार्यवाही करावी. सिन्नर तालुक्‍यातील आदिवासीच्या जमीनीवरील अतिक्रमणाचा विषय मार्गी लावावा. प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त आदिवासीचे प्रश्‍न मार्गी लावावेत. 

विधवा,अपंग निराधार आणि निराधार ज्येष्ठांच्या शासकीय मदत अनुदानात दुप्पट वाढ करावी. शहरी व ग्रामीण भागातील झोपडपट्टी, टपरीधारक किरकोळ विक्रेत्यांच्या 
अतिक्रमण काढण्यापूर्वी त्यांचे पर्यायी जागांवर पुर्नवसन करावे. नांदगाव,पेठ, सुरगाणा,कळवण, मालेगाव, चांदवड,इगतपुरी, सटाणा, निफाड येथील अतिक्रमित वनधारकांना 
त्यांच्या जमीनी करुन द्याव्यात. 
दलित,आदिवासी मागासवर्गीयांवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाया व्हाव्यात. अशा विविध मागण्यासाठी आदिवासी सेनेचे दि.ना.उघाडे, नामदेव भडांगे, यशोदाबाई कुंदे, 
पंडीत गांगुर्डे, चैत्राम आवारी, डॉ.शशिकांत नेरपगार, नारायण अडांगळे, सुभाष कुद्रे, सुरेश पवार आदीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शालीमार चौकातील डॉ. 
बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करीत, जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे धरले. सहाय्यक जिल्हाधिकारी 
नीलेश सागर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले

Web Title: marathi news adhivasi andolan