बिऱ्हाड आंदोलनासाठी रोजंदारी कर्मचारी अक्कलकुवामध्ये  दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नाशिक : आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संघर्ष संघटनेतर्फे बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी, तासिका आणि मानधन पद्धतीने काम करणारे वर्ग तीन व चारचे कर्मचारी बिऱ्हाड आंदोलनासाठी अक्कलकुवा येथे जमले आहे. उद्या (ता.21) सकाळी दहा वाजता आदिवासी आयुक्तालयावर आंदोलन करण्यासाठी हजाराच्या संख्येने हे आंदोलक नाशिककडे निघणार आहे. 

शासन सेवेत कायम करावे आणि भरती प्रक्रियेला स्थगिती मिळावी या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी संघर्ष संघटनेच्यावतीने बिऱ्हाड आंदोलनासह सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे. अक्कलकुवा येथून हजारोच्या संख्येने कर्मचारी हे पदयात्रा करीत नाशिकला येणार आहे. यासाठी आज (ता.20) राज्यातील गडचिरोली, नाशिक, तळोदा, नंदूरबार यासह राज्यातील इतर प्रकल्प कार्यालयातून हजारो कर्मचारी अक्कलकुवा येथे आले.

बिऱ्हाड आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आदिवासी आयुक्तालयात आंदोलन स्थगित करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेली बैठक देखील निष्फळ ठरल्याने आता आंदोलनाशिवाय या प्रशासन व सरकारला जाग येणार नसल्याचे संघटनेच्या पदधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

आपल्या प्रलंबित मागण्याकरीता संघटनेच्यातर्फे गेल्या तीन वर्षात चर्चा, आंदोलन करूनही शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही. गेल्या वर्षी देखील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी भर पावसामध्ये शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी सोग्रस फाटा ते नाशिक पदयात्रा काढून आयुक्तालयावर आंदोलन करण्यासाठी नाशिक शहराच्या हद्दीत प्रवेश करताच शासनाकडून त्यांना आडगाव येथे अडविले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी वाडा येथे चर्चेसाठी बोलवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी वेळ घेवून विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन देत आंदोलन स्थगित केले. मात्र त्या घटनेनंतरही संघटनेच्या मागण्यांबाबत कुठलीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. 

Web Title: marathi news adhivasi bihrad andolan