लग्नातील अवास्तव खर्चाला फाटा देण्याचा आदिवासी बांधवाचा निर्णय

नरेंद्र जोशी
सोमवार, 5 मार्च 2018

नाशिक : बागलाण तालुक्‍यातील चाफ्याचा पाडा या आदिवासी बहुल गावाने लग्नातील लाखो रुपयांच्या अवास्तव खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी समाज आता बदलाच्या दिशेने निघाला आहे. सत्कार, बॅण्ड या पुढे बंद करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

नाशिक : बागलाण तालुक्‍यातील चाफ्याचा पाडा या आदिवासी बहुल गावाने लग्नातील लाखो रुपयांच्या अवास्तव खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी समाज आता बदलाच्या दिशेने निघाला आहे. सत्कार, बॅण्ड या पुढे बंद करण्याचा ठराव करण्यात आला आहे.
आदिवासी भागात विशेषता भिल्ल समाजात लग्न समारंभ म्हटला की मोठ्या थाटमाटातच साजरा करण्याची रित आहे. कितीही गरीबी असली तरी सावकारांकडून कर्ज घेऊन लग्न थाटामाटातच साजरे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याने अनेक जण कायमचे कर्ज बाजारी होतात. बॅण्ड, आहेर, सत्कार,दारु व हुंडा यावर लाखोचा खर्च करण्यासाठी ते शेती तरी विकतात किंवा सावकारकडुन कर्ज तरी घेतात. भिल्ल समाज तर यात कर्जबाजारी होऊन लग्नानंतर तब्बल 15 वर्ष वधुपित्याला दुसऱ्याच्या शेतात राबण्या शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळेच ही प्रथाच बंद व्हावी. असा प्रयत्न काही समाज धुरींणांनी केला. आणि गावानेही साथ देण्याचे ठरवून आता गावात ही प्रथाच बंद करण्याचे गेल्या शुक्रवारी ( ता.2)ठरविण्यात आले. चाफ्याचा पाडा येथील तरुण व गावकऱ्यांनी  एकमुखाने हा निर्णय घेतला. 

 आता गावात आहेर, बॅण्ड, दारु, सत्कार, हुंडा बंदी केली आहे, लग्नात अक्षदां एैवजी फुले टाकली जातील. सत्कारा एैवजी गांधी टोपी घातली जाईल. भोजनासाठी पानांची पत्रावळ वापरली जाईल. दर वर्षी गावात पंधरा ते वीस लग्न होतात. प्रत्येताचा लाखो रुपये खर्च होतो. आता मात्र संरपंच भास्कर गांगुर्डे, वसंत चौरे, पुंडलीक सुर्यवंशी, सुक्रम गांगुर्डे, संजय गांगुर्डे, निंबा गावीत, वसंत गांगुर्डे, बारुक गावीत, रमेश सुर्यवंशी, नागु गांगुर्डे, शाताराम गावीत यांनी ही चळवळ यशस्वी केल्याने लाखोची बचत होणार आहे. 
 

Web Title: marathi news adhivasi people marriage