केंद्राकडून आदिवासी विकासासाठी  गेल्यावर्षी राज्याला 1 हजार कोटी 

residenational photo
residenational photo

नवी दिल्लीः केंद्रीय आदिवासी मंत्रालयातर्फे देशातील आदिवासींच्या विकासासाठी 2017-18 मध्ये संपूर्ण 25 हजार 285 कोटी 90 लाख रूपये मंजूर करण्यात आले. त्यात महाराष्ट्रासाठीच्या 1 हजार 120 कोटी 87 लाखांचा समावेश आहे.
देशातील आदिवासींच्या विकासासाठी केंद्रातर्फे 273 योजना राबविण्यात येतात. या योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाचे 32 विभाग आणि 33 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना 30 हजार 970 कोटी 49 लाखांच्या निधींचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या 9 विभागांतर्फे आदिवासी विकासाच्या 31 योजना राबवण्यात येतात. 
राज्यांच्या आदिवासी विभागास केंद्राकडून सर्वाधिक 358 कोटी 50 लाख 77 हजारांचा निधी मंजूर झाला. या विभागातर्फे आदिवासी विकासाच्या 3 योजनांची अंमलबजावणी केली जाते. याशिवाय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे 4 योजनांसाठी 180 कोटी 15 लाख, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे 4 योजनांसाठी 165 कोटी 44 लाख, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे 2 योजनांसाठी 116 कोटी 62 लाख, ग्रामीण विकासच्या 2 योजनांसाठी 116 कोटी 62 लाख, महिला व बाल विकास विभागाच्या एका योजनेसाठी 68 कोटी 22 लाख, कृषी- सहकार व शेतकरी कल्याणच्या 11 योजनांसाठी 52 कोटी 56 लाख तर उच्च शिक्षण विभागाच्या 2 योजनांसाठी 27 कोटी 68 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 
अन्य संस्थांसाठी 321 कोटी 
राज्य सरकारच्या विविध विभागांशिवाय राज्यात कार्यरत विविध संस्थांतर्फे आदिवासी विकासाच्या योजना व कार्यक्रम राबविण्यासाठी 321 कोटी 75 लाखांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. त्यातंर्गत मुंबई येथील क्रेडीट गॅरंटी फंड ट्रीस्ट फॉर मायक्रो×ण्ड स्मॉल एन्टरप्रायजेस (CGTMSE) संस्थेला 246 कोटी 16 लाख, मुंबईच्या आयआयटी ला 22 कोटी 6 लाख, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळास 7 कोटी 37 लाख, पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला 6 कोटी 64 लाखांचा निधीचा समावेश आहे. 
महाराष्ट्रातील या प्रातिनिधिक संस्थासह एकूण 96 संस्थांना केंद्रीय आदिवासी मंत्रालयातर्फे हा निधी मंजूर झाला. 

यंदाच्या अर्थसंकल्पात 94 टक्के वाढ 
केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये आदिवासी विकासासाठी 39 हजार 135 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2012-13 च्या तुलनेत ही तरतूद 94 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. 2016-17 मध्ये आदिवासी विकासाची तरतूद वाढवून 32 हजार 508 कोटी करण्यात आली. 2015-16 साठी एकूण 21 हजार 811 कोटी, तर 2014-15 मध्ये 20 हजार 535 कोटींची तरतूद करण्यात आली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com