#BattlfForNashik विकास पुढे नेण्यासाठी  युतीलाच पुन्हा सत्ता द्या- आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

नाशिक अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या विकासाची गाडी रुळावर आली होती; परंतु कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या काळात मात्र भ्रष्टाचारामुळे विकासाची वर्षे वाया गेली. तर भाजप आघाडी सरकारची गेली पाच वर्षे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची पापे धुण्यात गेली. त्यामुळे विकासाची आतापर्यंतची केलेली कामे पुढे नेण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. 

सिडकोतील पवननगर येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी आम्ही चार वर्षे भांडलो. आता एकत्र आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. आम्ही भांडलो हे खरे असले तरी ज्या वेळी युती करण्याचा विचार आला त्या वेळी देशाला विकास दाखविणारे, खंबीर नेतृत्वाची गरज असल्याने मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने युती केली. देशाला खंबीर नेतृत्व देणारा पंतप्रधान हवा की लोकांच्या खिशात हात घालणारा पंतप्रधान हवा. तुरुंगात जाऊन शंभर टक्के हजेरी लावणारा खासदार हवा की विकास दाखविणारा खासदार हवा, असा सवाल ठाकरे यांनी करत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. 

मोदी सत्तेवरून गेल्यास देश हातून गेल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी पंतप्रधान झाले, तर 370 कलम कायम राहील, देशद्रोहाचे कलम 124 काढले जाईल. ओमर अब्दुल्ला काश्‍मीर वेगळा मागून तेथील पंतप्रधान होतील, असा आरोप करताना जनतेची कामे करणारा खासदार हवा की भ्रष्टाचारी खासदार, असा सवाल ठाकरे यांनी केला.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी हिंदुत्वासाठी भाजप-शिवसेनेची युती झाल्याचे सांगताना शिवसेनेच्या जोरावर मोठे झालेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा सल्ला अपक्ष उमेदवार ऍड. माणिकराव कोकाटे यांना दिला. या वेळी व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते. 

Web Title: marathi news aditya sabha