नाशिकच्या मैदानात आदित्य ठाकरे रविवारी साधणार संवाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

नाशिकः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. येत्या रविवारी (ता. 7) युवकांशी संवाद साधण्याबरोबरच रोड शोद्वारे पुन्हा एकदा नाशिककरांसमोर येणार आहे. 

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने युवा चेहरा म्हणून आदित्य ठाकरे यांना नाशिकच्या मैदानात उतरवले आहे. त्यांनी रोड शोच्या माध्यमातून नाशिकच्या युवकांना आकर्षित केले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद, भद्रकालीमधील साक्षी गणेश मंदिर व काळाराम मंदिरात पूजा करून आदित्य यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. जुने नाशिकसह नाशिक रोड भागात रोड शोच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा हाच प्रयोग आदित्य यांच्या माध्यमातून होणार आहे. युवा मतदारांशी संवाद साधण्यासाठी "आदित्य संवाद' असे उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे.
 
Web Title: marathi news aditya thakre