"रेडी टू इट' अन्‌ प्रक्रिया ÷उद्योगाकडे शेतकऱ्यांना वळवावे -झगडे

1
1

नाशिकः तंत्रज्ञान आत्मसात करुन प्रयोगशीलता सिद्ध करणाऱ्या प्रगल्भ शेतकऱ्यांनी नाशिकचे ओळख सातासमुद्रापलिकडे पोचवलीय. आता मात्र कारखानदारी अथवा नोकरी चे युग राहणार नसून शेतकऱ्यांचे शतक होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना "रेडी टू इट' अन्‌ प्रक्रिया उद्योगाकडे वळवावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी आज येथे केले.

इदगाह मैदानावर कृषी विभागाचे शेतकरी ते ग्राहक दालन श्री. झगडे यांच्या हस्ते खुले झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, आमदार डॉ. राहूल आहेर, नरहरी झिरवाळ, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, आत्माचे संचालक सुभाष खेमनार, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, कृषि सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे आदी उपस्थित होते. 

जगभरामध्ये तयार पदार्थ खाण्याकडे कल आहे. त्याचाच परिपाक म्हणजे, अमेरिकेतील काही राज्यातील स्वयंपाकगृह बंद पडत चालली आहेत. तसेच ब्राझीलमध्ये 70 टक्के अन्नावर प्रक्रिया होते. आपल्या देशात 3 टक्के प्रक्रिया होते याकडे लक्ष वेधून श्री. झगडे यांनी कृषी विभागाने ब्रॅंडींग आणि विपणनने लक्ष द्यायला हवे असे अधोरेखित केले. त्याला जोडून त्यांनी कृषी सहाय्यक "मार्केटींग मॅनेंजर' म्हणून कार्यरत रहावे असे सूचवले. ते म्हणाले, की आगामी काळात 65 टक्के नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे शहरी माणूस रोजगाराच्या शोधात गावाकडे जाईल. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या हातून शेती जाणार नाही याची काळजी घ्यावी. 
खरेदीचे व्हावेत करार 

"बिझनेस टू बिझनेस' ही चर्चा जिल्हा कृषी महोत्सवात होत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करणारे करार व्हावेत. फळ आणि शेतमालाची प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमधील खरेदीदार अधिकाऱ्यांना आणून बाजारपेठेची व्याप्ती राज्याप्रमाणेच देशभर व्हावी, असेही श्री. झगडे यांनी सांगितले. 

700 कोटींचे प्रकल्प 
जागतिक बॅंकेच्या सहकार्याने मूल्यवर्धन आणि विपणनच्या अनुषंगाने आत्मा तर्फे राज्यात 700 कोटींचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत, असे सांगून श्री. खेमनार म्हणाले, की प्रत्येक जिल्ह्यात 12 शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. त्यांच्यासाठी व्यवसाय आराखडा मंजूर करुन अनुदान देण्यात येत आहे. राज्यात मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या 400 कंपन्या स्थापन होतील. याशिवाय राज्यात गटशेतीचे 147 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. सौ. सांगळे, प्रा. फरांदे, सौ. हिरे, श्री. झिरवाळ यांची भाषणे झाली. श्री. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांनी लिहिलेल्या "कीडनाशके-ओळख व हाताळणी' आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 
पुरस्काराने गौरवण्यात आलेले शेतकरी गट आणि शेतकरी असे ः भगूरचा मल्हारी बाबा स्वयंसहाय्यता शेतमाल शेतकरी बचतगट, बांबळेवाडीचा भक्तराज जटायू सेंद्रीय शेतमाल उत्पादक गट, उगावचा श्री श्री सेंद्रीय फळे व भाजीपाला उत्पादक गट, जोपूळचा संपूर्णा सेंद्रीय शेतमाल संलग्न उत्पादन व विक्री शेतकरी गट, कातरणीचे पार्वती कृषि विज्ञान मंडळ, लोणारवाडीची देवनदी व्हॅली ×ग्री प्रोड्यूसर कंपनी, कणकापूरचा शेतकरी महिला बचत गट, तळेगाव वणीचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता शेतकरी बचतगट, हातरुंडीचा श्री श्री सेंद्रीय शेतीमाल उत्पादक व विक्री बचतगट, पिंपळगावचा गंगापूत्र सेंद्रीय शेती शेतकरी गट, ताहराबादचा श्री स्वामी समर्थ सेंद्रीय शेतमाल उत्पादक गट. शेतकरी- संध्या बस्ते, संतोष देशमुख, गणेश जाधव. आदर्श शेतकरी पुरस्कार-अस्तगांवचे बबन शिंदे.

दरम्यान, जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यासाठी केंद्र आणि राज्यातील मंत्री उपस्थितीत राहतील, असे जाहीर करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र मंत्र्यांनी सोहळ्याकडे पाठ फिरवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com