एअर डेक्कनची हवाई सेवा जमिनीवर 

विक्रांत मते
शनिवार, 17 मार्च 2018

नाशिक : डिसेंबर महिन्यात वाजत गाजत सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नाशिक व नाशिक-पुणे हवाई सेवेला घरघर लागली असून कंपनीच्या वतीने बुधवार पासून सेवा बंद करण्यात आली आहे. सोमवार पर्यंत हि सेवा बंद करण्यात आली असून नाशिककरांकडून प्रतिसाद मिळतं नसल्याचे कारण स्थानिक अधिकाऱ्यांनी देवून अन्याय केला आहे. वास्तविक नाशिक-मुंबई हवाई सेवेबाबत वेळेची अनिश्‍चितता असताना कंपनीचा दोष नाशिककरांच्या माथ्यावर मारण्यात आला.

नाशिक : डिसेंबर महिन्यात वाजत गाजत सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नाशिक व नाशिक-पुणे हवाई सेवेला घरघर लागली असून कंपनीच्या वतीने बुधवार पासून सेवा बंद करण्यात आली आहे. सोमवार पर्यंत हि सेवा बंद करण्यात आली असून नाशिककरांकडून प्रतिसाद मिळतं नसल्याचे कारण स्थानिक अधिकाऱ्यांनी देवून अन्याय केला आहे. वास्तविक नाशिक-मुंबई हवाई सेवेबाबत वेळेची अनिश्‍चितता असताना कंपनीचा दोष नाशिककरांच्या माथ्यावर मारण्यात आला.

 नाशिक-पुणे सेवेला उस्फुर्त प्रतिसाद मिळतं असताना देखील चुकीची कारणे पोहोचविण्यात आल्याचे समजते. 
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत राज्यात विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उडान योजनेत नाशिकचा सर्वप्रथम समावेश करण्यात आला परंतू नियोजित वेळेत सेवा सुरु झाली नाही. मुंबई एअरपोर्टवर स्लॉट मिळतं नसल्याचे कारण देत सेवा सुरु झाली नाही. केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रतिसाद मिळतं नसल्याचे कारण देत उडान योजनेतून नाशिकचे नाव कापले होते.

   खासदार हेमंत गोडसे यांनी स्लॉट मिळतं नसल्याची माहिती विमान वाहतुक मंत्रालयापर्यंत पोहोचविली त्याव्यतिरिक्त जीव्हीके कंपनी विरोधात दिल्लीत आंदोलन केल्याने त्याची दखल घेण्यात आली. डिसेंबर महिन्यात 23 तारखेला विमान सेवा सुरु होणे अपेक्षित होते प्रत्यक्षात 28 डिसेंबरला सेवा सुरु झाली. सुरुवातीपासूनचं नाशिक-मुंबई विमानसेवेला घरघर लागली ती अद्यापर्यंत कायम राहिली आहे. सकाळी सहा वाजेची ओझर येथून उड्डाणाची वेळ असताना दुपारी बारा वाजता विमान उडू लागले. त्यावेळेलाही नाशिककरांनी प्रतिसाद दिला.

नाशिक-पुणे सेवा मात्र आतापर्यंत प्रतिसादासह सुरळीत होती. पण गेल्या आठ दिवसांपासून सेवेचा पुरता बोजवाला उडाला असून बुधवार पासून कंपनीच्या वतीने सोमवार पर्यंत सेवा बंद केली आहे. यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. 

अपयशाचे खापर नाशिककरांच्या माथी 
नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे सेवेला नाशिककरांकडून प्रतिसाद मिळतं नसल्याचे कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात डेक्कन एअरवेजच्या चुकीच्या नियोजन कारणीभुत ठरले आहे. तिकीटांची बुकींग फक्त वेबसाईटवरून करण्याची सोय आहे परंतू वेबसाईट अनेकदा बंद असल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. मध्यंतरीच्या काळात ज्यांनी तिकीटे बुक केली त्यांना सेवेबाबत वाईट अनुभव आले. ओझर एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर तेथे साधा शिपाई देखील आढळला नाही. गेल्या आठवड्यात काही शेतकरी प्रवासासाठी गेले असता त्यांना सेवा उपलब्ध झाली नाही. ट्रॅव्हल्स असोसिएशनने प्रवाशी ओझर विमानतळावर पोहोचविण्याची जबाबदारी घेतली असताना त्यांना देखील कंपनीकडून उत्तर आले नाही. कंपनीच्या कामकाजातचं ढिसाळपणा असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रतिसाद मिळतं नसल्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून त्यांच्या अकार्यक्षमतेचे खापर नाशिककरांवर फोडल्याचा आरोप होत 
 

Web Title: marathi news air Deccan air service