जातीय सलोखा राखण्यात अपयश,आतातरी गृहमंत्रीपद सोडा-अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नाशिक : औरंगाबादची दंगल हे सरकारचे अपयश आहे. सरकारनें त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे. राज्यात भिमा-कोरेगाव ते औरंगाबाद दंगलीपर्यत वेळोवेळी राज्य सरकार जातीय सलोखा टिकविण्यात अपयशी ठरल्याचे पुढे आले आहे. वारंवार गृहमंत्रीपद बदलण्याची मागणी होते. पण मुख्यमंत्री ते सोडत नाही. असा आरोप 

नाशिक : औरंगाबादची दंगल हे सरकारचे अपयश आहे. सरकारनें त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे. राज्यात भिमा-कोरेगाव ते औरंगाबाद दंगलीपर्यत वेळोवेळी राज्य सरकार जातीय सलोखा टिकविण्यात अपयशी ठरल्याचे पुढे आले आहे. वारंवार गृहमंत्रीपद बदलण्याची मागणी होते. पण मुख्यमंत्री ते सोडत नाही. असा आरोप 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 
विधान परिषदेच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने श्री पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मुख्यमंत्र्यासह भाजप सरकारवर टिका केली. श्री पवार म्हणाले, सोशल मीडियावर जुने फोटो दाखवून औरंगाबादची दंगल भडकवली गेली. दंगलीत जे दोषी आहेत. त्यांना शोधा, बघ्याची भूमिका घेणाऱ्यांवर 
कारवाई व्हायला हवी. पोलिस अगोदरच जागृक हवे होते, वरिष्ठ अधिकारी नाही. जाब कोणाला मागायचा असा आरोप करत प्रशासनाकडून शासनाला गोपनीय माहीती येते. पण शासन त्यानुसार कारवाया करण्यात अपयशी ठरते. नागपूरला 7 दिवसांत 12 खून, नगर जिल्ह्यात गोळीबारात कार्यकर्त्यांच्या हत्या यासारख्या अनेक घटनातून राज्यात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असल्याचा आरोप त्यांनी केला. 

आघाडीचाही 3-3 चा फॉर्म्युला 
ते म्हणाले कॉग्रेस आघाडीचा विधान परिषदेसाठी 3 चा फॉर्म्युला आहे. आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी मी व थोरात एकत्र बसून व्यूहरचना करणार आहोत. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूकांसाठी कॉग्रेस आघाडी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरु आहे. महापालिका पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीने मनसे उमेदवाराला मदत केली होती. त्यानुसार मनसे विधान परिषदेसाठी आघाडीसोबत आहे.असे सांगून भाजप सरकारवर साखर आयातीच्या अनुषंगाने जोरदार टिका केली. 

 
अजित पवार म्हणाले 
26 महिने तुरुंगवास हा भुजबळांवर अन्यायच 
दंगलीत नुकसान झालेल्यांना त्वरीत मदत द्यावी 
ब्रिफींग मिळूनही निर्णय घेण्यास मुख्यमंत्री कमी 
जातीय विद्वेषाबाबत युती सरकार गंभीर नाही 
 

Web Title: marathi news ajit pawer