युतीची काळजी नको,आपण सज्ज रहा- माधव भंडारी

माणिक देसाई
रविवार, 18 ऑगस्ट 2019

निफाड - भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुका शिवसेनेशी युती करून लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे शिवसेनेचा जरी मतदारसंघ असला तरी आपल्याला उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे उद्या युती होवो अगर न होवो ,जे होईल त्याला आपण सामोरे जाणार आहोत त्यासाठी आपली सर्व प्रकारची तयारी असावी यासाठी मतदार संघनिहाय संमेलन घेतले जात आहे,भाजपच्या पदाधिकार्यांनी पंतप्रधान मोदींनी देशात राबवलेल्या विकासयोजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन भाजपचे पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले यावेळी निफाड विधानसभा मतदार संघ भाजपने लढवावा ही कार्यकर्त्यांची इच्छा मी वरीष्ठपर्यंत पोहचविल ह

निफाड - भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुका शिवसेनेशी युती करून लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे शिवसेनेचा जरी मतदारसंघ असला तरी आपल्याला उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे उद्या युती होवो अगर न होवो ,जे होईल त्याला आपण सामोरे जाणार आहोत त्यासाठी आपली सर्व प्रकारची तयारी असावी यासाठी मतदार संघनिहाय संमेलन घेतले जात आहे,भाजपच्या पदाधिकार्यांनी पंतप्रधान मोदींनी देशात राबवलेल्या विकासयोजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन भाजपचे पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले यावेळी निफाड विधानसभा मतदार संघ भाजपने लढवावा ही कार्यकर्त्यांची इच्छा मी वरीष्ठपर्यंत पोहचविल हेही भंडारी यांनी स्पष्ट केले

       निफाड येथे निफाड विधानसभा शक्ती केंद्र व बूथ प्रमुख व पेज प्रमुख संमेलन प्रसंगी माधव भंडारी बोलत होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,निवडणुका युतीत लढवणार आहोत तरीही कामाची जाबाबदारी टाळता येणार नाही,मतदान करणाऱ्या प्रत्येकाला केंद्रापर्यंत आणणे हे काम आपले आहे , विरोधकांची मनस्थिती पराभुताची आहे आपल्याला कोणीही सध्या आव्हान देऊ शकत नाही असे असले तरी आपल्याला गाफील राहायचे नाही,पंतप्रधान मोदींनी नव्या सरकारमध्ये जे निर्णय घेतले ते जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे,370 कलम बाबत सभागृहात तरुण खासदारांनी मनोगत व्यक्त केले ही पक्षाची कार्यपद्धती आहे . 

     यावेळी व्यासपीठावर खासदार भारती पवार,सुरेशबाबा पाटील,जिल्हाध्यक्ष दादा जाधव,शंकर वाघ,संजय वाबळे,बापू पाटील,सतीश मोरे,लक्ष्मण सावजी,लक्ष्मण निकम,नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे,राजाभाऊ शेलार ,वैकुंठ पाटील,भागवत बोरस्ते गुरुभाऊ कांदे ,संजय गाजरे प्रविण अलईहे  उपस्थित होते.यावेळी सुरेशबाबा पाटील,लक्ष्मण सावजी खा पवार यांनीही मार्गदर्शन केले.

      या संमेलनाला  जगणराव कुटे,बबनराव सानप,शरद नाठे,दिनकर कुयटे,प्रकाश घोडके,मीना बीडकर,अश्विनी मोगल सुरैखा कुशारे ,सोमनाथ वाकचौरे, शरद लोहकरे, विजय शिंदे आदेश सानप ,नामदेव शिंदे , संजय शिंदे , नाना कांदळकर महेश गिरी मुरलीधर सोनवणे संजय निश्चित सोमनाथ लोकरे दत्तात्रय काळे प्रकाश घोडके जितेश निकम मनोज भुतडा योगेश चौधरी  यांच्यासह निफाड विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aliance of bjp ss