एकावन्न वर्षांच्या अलका ठाकरेंनी  दिला दहावी मराठीचा पेपर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

अंदरसूल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयात 51 वर्षीय अलका ठाकरे व 45 वर्षीय मंगला बोरसे या महिलांनी दहावीचा पेपर दिला. 

अंदरसूल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयात 51 वर्षीय अलका ठाकरे व 45 वर्षीय मंगला बोरसे या महिलांनी दहावीचा पेपर दिला. 
अलका ठाकरे अंगणवाडीसेविका आहेत. घरगुती कारणामुळे दहावीचे काही पेपर त्यांना देता आले नाहीत. नोकरीसाठी दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी इतर विद्यार्थ्यांसोबत बसून पेपर दिल्याने इतरांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या मंगला बोरसे यांनीदेखील वयाच्या 45 व्या वर्षी दहावीचा पेपर दिला. अंदरसूल येथील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय आणि मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालय या दोन केंद्रांतर्गत 565 विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. दर वर्षी बाहेरून कॉपी पुरविणाऱ्या टवाळखोरांमुळे अंदरसूल केंद्रावर पोलिसांची यंदा मात्र करडी नजर होती. गावातील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय केंद्रावर काही काळ टवाळखोरांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले. या वर्षी नव्याने सुरू झालेल्या सोनवणे विद्यालयात पेपर मात्र सुरळीत पार पडला. 

Web Title: marathi news alka thakre

टॅग्स