esakal | "कोरोना हॉटस्पॉट"...दहिवदच्या सुपूत्राची मालेगावात सेवा 
sakal

बोलून बातमी शोधा

police

शहरात उत्तम सेवा बजावली आहे. त्याच अनुभवानुसार ते मालेगावात उत्तम सेवा देत असून या कठीण परिस्थितीत कुटुंबापासून त्यांना दूर राहावे लागत आहे.

"कोरोना हॉटस्पॉट"...दहिवदच्या सुपूत्राची मालेगावात सेवा 

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर :  दहीवद (ता अमळनेर) या गावाचे भूमिपुत्र तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे कोरोनाच्या दृष्टिकोनातून हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मालेगावात कोरोना सेल समन्वयक आणि नियंत्रण कक्षाचे प्रभारी अधिकारी म्हणून अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी ते सांभाळत आहेत. 

नक्की वाचा : भाषण नको, रेशन पाहिजे, वेतन पाहिजे... "सीटू'तर्फे आंदोलन
 

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे शहर हॉटस्पॉट ठरून प्रशासनाने संपूर्ण लक्ष याकडे वेधले आहे. लॉकडाऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक कर्तबगार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मालेगावात कर्तव्य बजावण्यासाठी पाठविण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून वासुदेव देसले यांच्यावर कोरोना सेल समन्वयक ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आल्यांने ती ते काळजीपूर्वक सांभाळत आहेत. श्री. देसले यांनी धुळे, सोनगीर, भुसावळ, नांदेड, जालना, नंदुरबार, नवापूर, सटाणा आदी शहरात उत्तम सेवा बजावली आहे. त्याच अनुभवानुसार ते मालेगावात उत्तम सेवा देत असून या कठीण परिस्थितीत कुटुंबापासून त्यांना दूर राहावे लागत आहे. मात्र, कर्तव्यास प्राधान्य देणारे ते अधिकारी असल्याने अतिशय आनंदाने जोखमीत असताना ते सेवा देत आहेत. 

आर्वजून पहा : पालकांनो, पावसाळ्यातही लावा बिनधास्त विवाह; पंचांगानुसार या आहेत तिथी...
 

पत्नीचाही कोरोना लढाईत सहभाग 
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची समाजाच्या दृष्टीने असलेली हितकारक कार्यपद्धती व जन्मभूमी असलेल्या दहीवद (ता. अमळनेर) गावासाठी असलेली तरमळ पाहून ग्रामस्थांनी वासुदेव देसले यांच्या पत्नी सुषमा पाटील यांना गावात प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून विराजमान केले आहे. त्यांनी पदाचे सूत्र हाती घेतल्यापासून तालुक्यात सर्वाधिक मोठे गाव असलेल्या दहीवद गावात प्रचंड विकास कामे व जनहितार्थ उपक्रमाच्या माध्यमातून त्या प्रकाशझोतात आल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोना विरुद्धच्या लढाईतही त्या सक्रिय सहभागी होऊन गावाच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवित आहेत. यासाठी अनेकदा स्वतःही रस्त्यावर उतरून ग्रामस्थांना घरातच बसण्याच्या सूचना त्या देत आहेत. एकीकडे पती कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कर्तव्य बजावीत असताना दुसरीकडे पत्नी गावाला कोरोनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याने या पतीपत्नीचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. 

क्‍लिक कराः जिल्हा सीमा बंदी उल्लंघन रोखण्यासाठी  विशेष पथकांची नियुक्ती - निवासी...
 

loading image