अमळनेर येथे शेतकऱ्यातर्फे रस्त्यावर दूध फेकून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

अमळनेर : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी मान्य केलेल्या विविध मागण्या एक वर्ष पूर्ण होऊनही पूर्ण न केल्याने शेतकरी संघटणे मार्फत आज सकाळी बळीराजा स्मारकाजवळ रास्तारोको करून आंदोलन केले

अमळनेर : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी मान्य केलेल्या विविध मागण्या एक वर्ष पूर्ण होऊनही पूर्ण न केल्याने शेतकरी संघटणे मार्फत आज सकाळी बळीराजा स्मारकाजवळ रास्तारोको करून आंदोलन केले
यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही,बँकांना पैशे मिळूनही बँक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करीत नाही,बँके कडून निरंक चा दाखला मागितला असता बँक शेतकऱ्यांना कर्जमाफीत निरंक चा दाखला देते,शासन शेतकऱ्यांना कर्ज बुडवे म्हणत आत्महत्या करण्यास भाग पाडते अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊन शासना विरोधात घोषणा देत दूध,कांदे टमाटे व  शेतीमाल रस्तावर फेकून शासनाचा निषेध करीत उपविभागीय अधिकारी संजय गायवकवाड यांना निवेदन दिले यावेळी तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला यावेळी संदीप पाटील,धनगर पाटील,गोकुळ पाटील,सुरेश पाटील,प्रा सुभाष पाटील,अनंत निकम,सचिन पाटील,शिवाजी पाटील,अड गिरीश पाटील,संजय पुनाजी पाटील,सुलोचना वाघ आशा चावरिया यांच्या सह तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते 

Web Title: marathi news amalner former strike road milk