नैराशेतून कळमसरेत एकाने घेतले पेटवून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

अमळनेर ः अमळनेर तालुक्‍यातील कळमसरे येथील रामलाल वामन चौधरी या 50 वर्षीय इसमाने गावाच्या बाहेर अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतले. यात ते 70 ते 80 टक्‍के भाजले गेले असून, पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आले आहे. 

कळमसरे गावाजवळील खेडी रस्त्यावर रामलाल चौधरी हे सायकलीवर सोबत बाटलित रॉकेल घेवून गेले होते. खेडी रस्त्यावर त्यांनी बाटलीतील रॉकेल अंगावर टाकून घेत स्वतःला पेटवून घेतले. रामलाल हे बऱ्याच दिवसांपासून नैराशेत असल्याची चर्चा होती, त्यातूनच त्यांनी जाळून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ते डोक्‍यापासुन कंबरेपर्यंत जळाले असल्यामुळे त्यांची ओळख देखील पटत नव्हती. मात्र, काही वेळानंतर गल्लीतील ग्रामस्थांनी त्याच्या जवळील असलेल्या सायकल वरुण ओळख पटवली. जवळपास एक तास ओळख पटण्यास लागला. दरम्यान 80 टक्‍के शरीर जळाल्यामुळे त्यांना ग्रामस्थांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयास 108 या रुग्नवाहिकेस फोन लावून बोलावून घेतले. येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ त्याला धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 
 
Web Title: marathi news amalner kalmsare