प्रा. दीपक पाटील खूनप्रकरणी संशयित राज चव्हाण जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

अमळनेर : अट्टल घरफोड्या करणारा व प्रा दीपक पाटील खून प्रकरणातील संशयित आरोपी राज चव्हाण यास अमळनेर पोलिसांनी बुधवारी (ता. 16) मध्यरारात्री दोनला कारंजा (जि. वाशीम) येथून ताब्यात घेतले.  त्याला अमळनेर पोलीस ठाण्यात आणले आहे.

प्रा. दीपक पाटील खून प्रकरणात राज ची माहिती देणाऱ्यास 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. शहरात लूटमार करणे, हॉटेल चालकांवर प्राणघातक हल्ला करणे, तसेच प्रा दीपक पाटील खून प्रकरणात प्राथमिक तपासातही राज चव्हाण हा मुख्य संशयित आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ पाटील, हवालदार प्रमोद बागडे,किशोर पाटील, सुनिल पाटील यांच्या पथकाने राजला ताब्यात घेतले.

Web Title: marathi news amalner murder chavan