पाडळसरे जनआंदोलन समितीकडून जलसंपदामंत्री महाजन यांचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

अमळनेर ः चोपडा नाका येथे पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे महायुतीच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काळ्या पट्या गळ्यात घालून आंदोलनकर्त्यांनी 'पाडळसरे धरण झालेच पाहिजे‘चे घोषणा फलक दाखवून चोपडा नाक्यावर निदर्शने केली. 

अमळनेर ः चोपडा नाका येथे पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे महायुतीच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काळ्या पट्या गळ्यात घालून आंदोलनकर्त्यांनी 'पाडळसरे धरण झालेच पाहिजे‘चे घोषणा फलक दाखवून चोपडा नाक्यावर निदर्शने केली. 

वर्षानुवर्षे रखडलेले पाडळसरे धरण शीघ्र गतीने पूर्ण व्हावे म्हणून पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे दीर्घकाळ आंदोलन करण्यात आले. जलसंपदामंत्री महाजन यांनी महामोर्चास निधी देण्याचे दिलेले आश्वासन न पाळल्याने जनआंदोलन समितीतर्फे मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी श्री. महाजन यांना पाडळसरे धरणास दिलेले आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी चोपडा नाका येथे डोक्यावर टोप्या घालून, हातात घोषणा फलक घेऊन, गळ्यात काळ्या पट्या घालून मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने निदर्शन केली. याप्रसंगी श्री. महाजन यांनी गाडीतून उतरत आंदोलनकर्त्यांना बोला, आपलं काय म्हणणे आहे, मी रस्त्यावरचा माणूस आहे इथही बोलू या! असे सांगितले. आंदोलनकर्ते माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, प्रा. शिवाजीराव पाटील यांनी पाडळसरे धरण हा मोठा प्रश्न असून रस्त्यावर चर्चा करता येणार नाही असे सांगत "पाडळसरे धरण झालेच पाहिजे!" या फलकावरील मागणीकडे जलसंपदामंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर श्री. महाजन यांनी सांगितले की, धरण हा माझ्याच जिल्ह्यातील विषय आहे. मला या प्रश्नांची जाणीव आहे. निवडणुकीनंतर प्राधान्याने याकडे लक्ष देतो असे सांगितले. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. भाजपचे लोकसभा उमेदवार उन्मेष पाटील यांनी समितीसोबत जलसंपदा मंत्री हे महायुतीचा मेळावा संपल्यानंतर समितीच्या कार्यालयात चर्चा करायला येतील, असे सांगितले. याप्रसंगी जनआंदोलन समितीचे पदाधिकारी एस. एम. पाटील, रणजीत शिंदे, अजयसिंग पाटील, वसुंधरा लांडगे, प्रतिभा पाटील, प्रा. अशोक पवार, महेश पाटील, सुनील पाटील, योगेश पाटील, देविदास देसले, रवींद्र पाटील, प्रशांत भदाणे, एन. के. पाटील, सुनील पवार, आर. बी. पाटील, रामराव पवार, सतीश काटे, हेमंत भांडारकर, पुरुषोत्तम शेटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आंदोलन हाताळण्यात अपयश 
महायुतीच्या मेळावा झाल्यावर जलसंपदामंत्री हे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा न करताच परस्पर निघून गेल्याने समितीतर्फे रोष व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र भर अण्णा हजारेंच्या आंदोलनासह भव्य शेतकरी मोर्चे व विविध आंदोलन हाताळणारे गिरीश महाजन हे स्वतःच्या जलसंपदा खात्याशी संबंधित विषयावर स्वजिल्ह्यातील आंदोलन हाताळण्यात पुन्हा अपयशी ठरले आहे. 

Web Title: marathi news amalner padsare samiti girish mahajan nishedh