जवखेडेकरांचा आदर्श इतरांना प्रेरणादायी : आमीर खान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

अमळनेर : जवखेडे गावात ग्रामस्थांचे चांगल्या पद्धतीने सामुहिक मनसंधारण झाले आहे. सकारात्मक वृत्तीमुळे मनसंधारणाबरोब जलसंधारणाची सर्व कामे मार्गी लागतील. या गावातील ग्रामस्थांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे. स्पर्धेत बक्षीस मिळो अथवा न मिळो. मात्र, जवखेडेकरांनी आमचे मन जिंकले आहे, अशा भावना अभिनेते आमीर खान यांनी व्यक्‍त केल्या. 

पाणी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर जवखेडा येथे दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमती किरण राव, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, तहसीलदार प्रदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक रफीक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भिल, सरपंच सुभाष पाटील आदी उपस्थित होते. 
आमीर खान म्हणाले, की जवखेडेकरांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. 
सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. आमीर खान व किरण राव यांचे औक्षण करण्यात आले. दोन अहिराणी गीतांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. सुमारे तीन तास ते जवखेडा येथे थांबून होते. त्यांनी वॉटर कप स्पर्धेतर्गत विविध कामांची पाहणी केली. शोषखड्डे, रोपवाटिका आदींची त्यांनी पाहणी केली. ग्रामस्थांतर्फे आमीर खान यांना बैलगाडीची प्रतिकृती भेट देण्यात आली. आमीर खान यांनी अहिराणी गीते गाणाऱ्या विद्यार्थिनींचे कोडकौतुक केले.

Web Title: marathi news amalner pani foundetion