पाण्यासाठी जानवेकरांची वणवण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

अमळनेर : जानवे (ता. अमळनेर) येथे तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होत असून, टॅंकरच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. 
अमळनेर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर जानवे हे गाव आहे. धुळे रस्त्यालगत हे गाव असून, गावाची लोकसंख्याही मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत पाण्याचा मुबलक स्रोत नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होते. शासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा होत असला तरी तो पुरेसा नाही. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. 

भूजल पातळी घटल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाचही विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. ग्रामस्थांना दूर अंतरावरून शेतातून पाणी आणावे लागत आहे. ग्रामस्थ बैलगाडी, मोटरसायकल, सायकल व डोक्‍यावर पाणी वाहून पाण्याची व्यवस्था करीत आहेत. विशेषतः: महिलांचे यात खूप हाल होत आहेत. 
 
प्रशासनाने उपाययोजना कराव्यात 
तीव्र पाणीटंचाई असताना विविध उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. गावात एक बोअरवेल असून, त्यावर पाणी भरण्यासाठी झुंबड उडत आहे. गावातील हातपंपांचीही दुरुस्ती करणे गरजेचे आहे. 
 
विहिरींनी तळ गाठल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टॅंकरने होत असलेला पुरवठा कमी पडत आहे. यासाठी टॅंकर वाढवून देण्याची मागणी केली आहे. 
विजय सोनवणे, सरपंच, जानवे, ता. अमळनेर

Web Title: marathi news amalner pani tanchai