अमळनेरला साई लॉजवरील कुंटणखान्यावर एलसीबीचा छापा 

अमळनेरला साई लॉजवरील कुंटणखान्यावर एलसीबीचा छापा 

अमळनेर : धुळे रस्त्यावरील साई लॉजवर देहविक्री होत असल्यच्या संशयावरून जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) व अमळनेर पोलिसांच्या पथकाने छापा घातला. ही कारवाई आज दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी व्यवस्थापक व मालक या दोघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना येथे आज दुपारी दोनच्या सुमारास देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याबाबत माहिती मिळाली. श्री. कराळे व अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या आदेशावरून जळगाव गुन्हा अन्वेषण शाखा व अमळनेर पोलिस पथकाने साई लॉजवर छापा टाकला. बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता या लॉजवर देहविक्रीची खात्री पटली. लॉज व्यवस्थापक अंकुश पाटील (रा. मंगरूळ ता.अमळनेर) व लॉज मालक दिलीप टिल्लूमल ललवाणी (रा. न्यू प्लॉट, अमळनेर) यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लॉजवर रोख रक्कम 11 हजार 810 रुपये व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईसाठी जिल्हा गुन्हा अन्वेषण पोलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, सहायक फौजदार मनोहर देशमुख, नीलकंठ पाटील, रवी गायकवाड, रामचंद्र बोरसे, नरेंद्र वारुळे, मिलिंद सोनवणे, रमेश चौधरी, सविता पाटील, वैशाली पाटील, गायत्री सोनवणे, वहिदा तडवी, किशोर पाटील, रवी पाटील, प्रमोद बागडे, संतोष पाटील आदींचा पथकात सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com