अमळनेरनगरीत पालखी उत्सवास भाविकांची अलोट गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

अमळनेर : संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला पालखी उत्सवास भाविकांची अलोट गर्दी झाली. प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या अमळनेरनगरीत या दिवशी साक्षात पांडुरंगच सखाराम महाराजांच्या भेटीला येत असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

पालखीत श्री लालजींची मूर्ती विराजमान होते. पालखीच्या पाठीमागे मेणा असतो. त्यात संत सखाराम महाराज यांच्या पादुका असतात. ही पालखी मिरवणूक सकाळी सहाला नदीच्या वाळवंटातून सुरू झाली. पालखीपुढे बेलापूरकर महाराजांची दिंडी, लेझीम पथके, सनई-चौघडे, घोडे, बॅंड पथकांनी चैतन्यमय वातावरणनिर्मिती केली. भुसावळ येथील रेल्वेचे बॅंड पथकाने विशेष लक्ष वेधले. महिलांच्या ढोल पथकाच्या गजरात आसमंत दुमदुमला होता. रणरणत्या उन्हालाही न जुमानता भाविकांचा जल्लोष दिसून आला. पालखीच्या मागे संतश्री प्रसाद महाराज अनवाणी पावलांनी चालत होते. परंपरेप्रमाणे ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पालखीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी शिस्तीने दर्शन घेण्यासाठी सहकार्य केले. 
 
Web Title: marathi news amalner sakharam palkhi