"जनता कर्फ्यु व कोरोना'वर त्या शिक्षकाच्या गीताची धूम

"जनता कर्फ्यु व कोरोना'वर त्या शिक्षकाच्या गीताची धूम
अमळनेर : कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्नांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता 22) जनता कर्फ्युचे आव्हान केले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर आपणही त्यांच्या या कार्याला हातभार लावा या उद्देशाने पिंपळे बुद्रुक (ता. अमळनेर) येथील आश्रम शाळेचे शिक्षक सतीश कांगणे यांनी चित्रपटातील गीताच्या चालीवर कोरोना व जनता कर्फ्यू या विषयावर स्वरचित गीत त्यांनी स्वतः गायीले आहे. "मोदीजींनी.. उद्धवजींनी सांगितलेल्या गोष्टी ऐकूया...एक दिवस जनता कर्फ्यू आपण सर्व पाळूया...नका करू गर्दी तुम्ही...घरात शांत बसूया... नका व्यक्ती संपर्कात.. एवढी करा मेहरबानी.. कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज राहूया...' हे गीत आज सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या या गीताला प्रतिसाद नागरिकांनी देत घरीच राहणे पसंत केले आहे. त्यातच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी लॉक डाऊनचे आदेश दिल्यामुळे शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहे. घरी बसलेले नागरिक आपल्या घरीच बसून हे गीत ऐकणे पसंद करीत आहेत. नागरीकांचे काय करावे याचाही दिला संदेश कांगणे यांनी आपल्या या गीताच्या माध्यमातून नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठीच काय करावे व काय करू नये याचेही आवाहन केले आहे. वारंवार हात स्वच्छ धुवा, चेहऱ्याला जास्त हात लावू नका, मास्क चा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, सुरक्षित अंतर ठेवा यासारखे अनेक उपायही त्यांनी सुचवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com