esakal | जनधनचे पैसे देण्यासाठी बँक थेट ग्राहकांच्या दारी 
sakal

बोलून बातमी शोधा

jandhan cash

सामाजिक बांधिलकी जपली. मंगरूळ येथे ग्राहकांच्या खात्यात जमा झालेले पैसे थेट मिळत समाधान व्यक्त होत आहे. 

जनधनचे पैसे देण्यासाठी बँक थेट ग्राहकांच्या दारी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील युनियन बँकेच्या शाखेच्या अधिकाऱ्यांनी "होम टू होम' जाऊन महिला लाभार्थ्यांना पैसे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली. मंगरूळ येथे ग्राहकांच्या खात्यात जमा झालेले पैसे थेट मिळत समाधान व्यक्त होत आहे. 

हेपण वाचा - धक्कादायक : धुळे जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त; साक्रीतील एकाचा मृत्यू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकटकाळी गरीब महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने या महिलांच्या जनधन खात्यात प्रत्येकी ५०० रुपये टाकले आहेत. ज्या दिवसापासून रक्कम टाकली आहे. त्या दिवसापासून सर्वच बँकेच्या शाखेत मोठी गर्दी दिसून येत आहे.

नक्‍की पहा - जिल्ह्याच्या प्रदूषणात ७० टक्क्यांनी घट

जीव धोक्यात घालून हे ग्राहक पैसे काढण्यासाठी बऱ्याच बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून गर्दी करताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून काय करता येईल यासाठी थेट लाभार्थी पर्यंतच युनियन बँक पोहचल्याने आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पैसे वाटप करतेवेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाबत जनजागृतीचा संदेश दिला जात आहे. याप्रसंगी युनियन बँकेचे कर्मचारी उदय पाटील, किशोर सोनवणे, बँक मित्र भाऊसाहेब जगदाने उपस्थित होते. यासाठी मंगरुळ येथील प्रा. संदीप पाटील, समाधान परदेशी, विजय पाटील, अमोल पाटील आदी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. बँकेच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. शासनाने ही याच पध्दतीने सर्वच बँकांना असे निर्देश दिले तर बँकेतील गर्दी टाळता येईल पर्यायाने कोरोनावर मात ही करता येईल. 

loading image