अंबड लिंक रोडवरील कदंब वनात रोज भरते पक्षांची शाळा...! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

नाशिक ः सातपूर-अंबड लिंक रोडवरील कदंब वनात रोज पक्षांची भरतेय शाळा. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या बाबूल बंगाल्याच्या आवारात दाणा-पाण्याची व्यवस्था करण्यात आलीयं. पक्षांच्या किलबिलाट हा परिसर हरवून जातो. थंडीच्या चाहूलसोबत इथे चाळीस जातीच्या पक्षांनी वास्तव्याला सुरवात केली. 

नाशिक ः सातपूर-अंबड लिंक रोडवरील कदंब वनात रोज पक्षांची भरतेय शाळा. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या बाबूल बंगाल्याच्या आवारात दाणा-पाण्याची व्यवस्था करण्यात आलीयं. पक्षांच्या किलबिलाट हा परिसर हरवून जातो. थंडीच्या चाहूलसोबत इथे चाळीस जातीच्या पक्षांनी वास्तव्याला सुरवात केली. 

अंगणातील वेलीवरील फुलांमध्ये मध चाखण्यासाठी आलेला सूर्यपक्षी खूप सुंदर दिसतो. चष्मावाला हा पक्षी किडे शोधताना आढळतो, तर हळद्या सुंदर गातो. विनायकदादा रोज सकाळी जणू या पक्षांची शाळा चालवितात. दादा ज्यावेळी मंत्री होते, त्यावेळी त्यांना मोराची दोन अंडी आणून दिले होती. दादांनी त्यातील एक अंडे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना व दुसरे अंडे जेष्ठ नेते शरद पवार यांना दिले होते. रामदास फुटाणे यांनी दादांच्या काक प्रेमावर लेख लिहिला. 

नक्की वाचा- राज्य नाट्य स्पर्धेत नाशिकचा डंका

बाबूल बंगल्यात प्रवेश करतो, त्यावेळी पक्षांच्या माहेर घरात आल्यागत आनंद होतो. पक्षांचा किलबिलाट ऐकल्यावर इथे इतके पक्षी का येतात? असा प्रश्‍न उभा ठाकतो आणि त्याचे उत्तर लगेच मिळते. ते म्हणजे परसबाग हे होय.

Image may contain: bird

 इजिप्तमध्ये एका वृक्षाचा पाहिलेला अनोखा प्रयोग दादांनी परसबागेत केलायं. तो म्हणजे, कडूलिंबाचा मांडव. कडूलिंबाचे अनेक वृक्ष लावून त्यांचा नैसर्गिक मांडव करून त्यामध्ये कार्यक्रम करण्याचा दादांचा मानस आहे.

सिलोनमधून आणलेला सीता अशोक हे दुर्मिळ झाड इथे आहे. कवटी चाफा मोठ्या ड्रममध्ये लावून टाकावूतून टिकावूचा प्रयोग त्यांनी केला. परसबागेत नाशिकमधील एकमेव असा हिमचंपा हे दुर्मिळ वृक्ष बहरलेला आहे.

कदंबसोबत वांगी, भोकर, लीची, इजिप्तची चिंच हे वृक्ष लक्ष वेधून घेतात. दयाळ आणि बुलबुल या पक्षांनी घरात प्रवेश केला आहे. स्वर्गीय नर्तक हा देखणा पक्षी दादा विश्रांती कक्षातून पाहण्याचा आनंद घेतात. या कदंब वनात तीन वर्षापूर्वी बिबट्याने हजेरी लावलीयं. 

Image may contain: bird, plant and outdoor

""हिवाळ्यात परसबागेत पक्षी मोठ्या संख्येने येतात. त्यांना दाणे खायला घालण्याचा आणि चोचीने पाणी पिण्याची व्यवस्था केली. त्यामुळे रोज किलबिलाटाचा आनंद घेता येतो.'' 
- विनायकदादा पाटील, वनाधिपती 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ambad kadam van bird school