esakal | मुंबई एअरपोर्टवर नाकारले...मग अमेरिकेच्या संदेशाने अमळनेरच्या पियुषचे उड्डाण
sakal

बोलून बातमी शोधा

airport america

नजरचुकीने पासपोर्टची थोडी शिलाई निघल्याने डेमेज झाला. इथंच पियुषचा पुढील मार्ग अडचणीत येऊन त्याला अमेरिकेत जाणे नाकारण्यात आले. अनेक विनवण्या करूनही त्यावर तात्काळ कोणताही मार्ग निघू शकला नाही. त्याचे लगेज देखील त्यास परत देण्यात आले. 

मुंबई एअरपोर्टवर नाकारले...मग अमेरिकेच्या संदेशाने अमळनेरच्या पियुषचे उड्डाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर  : अमेरिकेत अभियंता म्हणून कार्यरत असलेला अमळनेरचा पियुष प्रकाश शिरोडे पंधरा दिवसांसाठी सुटीवर मायभूमी अमळनेरात आला होता. पासपोर्ट फाटल्याच्या कारणामुळे अमेरिकेत जाण्याचा मार्ग अडचणीत होता. दोन दिवसात नवे पासपोर्ट मिळवून प्रवासासाठी एअरपोर्टवर गेल्यानंतर पुन्हा पासपोर्ट नाकारण्यात आल्याने अमेरिकेला जायचे कसे? हा प्रश्‍न होता. दरम्यान अमेरीका गर्व्हमेंटला याबाबत कळविल्यानंतर अमेरीका गर्व्हमेंटच्या संदेशानंतर पियुषचे अमेरिकेकडे उड्डाण झाले. 

हेपण पहा -तृतीयपंथीयाचा "तो' खोटा शाप मध्यरात्री महिलांना घेऊन गेला स्मशानभूमीत...

प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश शिरोडे व भगिनी मंडळ संस्थेच्या संचालिका उज्वला प्रकाश शिरोडे यांचा सुपुत्र पियुषने अमेरिकेतच इंजिनिअरिंग क्षेत्रातील एम. एस.चे उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्षांपूर्वीच तेथील एका कंपनीत नोकरी मिळाली. अमेरिकेत असला तरी मायभूमीची प्रचंड ओढ त्याला असल्याने गेल्या वीस दिवसांपूरर्वीच तो भारतात येऊन अमळनेरला घरी आला होता. 

पासपोर्ट फाटल्याने प्रवास रद्द 
पंधरा दिवस कुटुंबासोबत घालविल्यानंतर पुन्हा अमेरिकेत जाण्यासाठी निघाला होता. त्याच्या आई-वडीलांनी त्याला मुंबई विमानतळापर्यंत सोडून ते पुन्हा अमळनेरच्या मार्गाला लागले. इकडे विमानतळावर विमानास दोन तास अवधी असताना पियुषची चेकिंग सुरू होती. त्यावेळी पियुष खिशातून पासपोर्ट काढताना नजरचुकीने पासपोर्टची थोडी शिलाई निघल्याने डेमेज झाला. इथंच पियुषचा पुढील मार्ग अडचणीत येऊन त्याला अमेरिकेत जाणे नाकारण्यात आले. अनेक विनवण्या करूनही त्यावर तात्काळ कोणताही मार्ग निघू शकला नाही. त्याचे लगेज देखील त्यास परत देण्यात आले. 

दुसऱ्या पासपोर्टसाठी पुणे प्रवास 
पियुषने अमळनेरकडे निघालेल्या आई-वडीलांना फोन करून माघारी बोलावले. पुढे काय करावे हे कुणालाही सुचत नव्हते. आई- वडिलांनी पियुषला धीर देत अमळनेरला आणले. दुसऱ्या दिवशी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसार दुसरे पासपोर्ट मिळण्यासाठी पुणे पासपोर्ट ऑफिसला अर्ज केला. सुदैवाने दुसऱ्याच दिवसाची अपॉइंटमेंट मिळाली. त्यामुळे पियुष पुण्याकडे निघाला. तेथे कार्यालयीन कारवाई पूर्ण झाल्यानंतर चारित्र्य पडताळणीसाठी सायंकाळी अमळनेर पोलिस ठाण्यात प्रकरण आल्यानंतर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्याने प्रकरण जळगाव मुख्यालयात पाठविण्यात आले. तेथेही संबंधित विभागाने सहकाऱ्यांची भूमिका दाखवत प्रकरण पुण्यात पाठविले. यामुळे तात्काळ पासपोर्ट प्रिंट होऊन पोस्टाद्वारे अमळनेरकडे निघाले. 

दुसरे पासपोर्टही रिजेक्‍ट 
एकीकडे ही धावपळ असताना पियुषला त्याच्या अमेरिकन कंपनीने अतिशय कमी अवधी दिला व दुसरीकडे कोरोनामुळे अमेरिकेचे अनेक हवाई मार्ग बंद होत असल्याने पियुषची प्रचंड घालमेल होत होती. सुदैवाने पोस्ट खात्यातील पुणे ते अमळनेर पर्यंतच्या अनेकांच्या मदतीने दोन दिवसांत पासपोर्ट पियुषच्या हाती लागल्याने लागलीच त्याने फ्लाईट बुक करून आई वडिलांसोबत मुंबई विमानतळावर पोहोचला. आई- वडील यांचे आशीर्वाद घेऊन आतमध्ये गेला असता, पुन्हा मोठा धक्का त्याला दिला; तो म्हणजे व्हिजा नाकारण्याचा. कारण नवीन पासपोर्टवर जुना व्हिजा चालणार नाही; असे सांगून त्याला पुन्हा माघारी पाठविण्यात आले. आता तर पियुष कमालीचा हादरला कारण कोरोनामुळे नवीन व्हिजा देणे भारत सरकारने बंद केले असल्याने पियुषच्या अमेरिका वारीवर प्रश्नचिन्हच निर्माण झाले होते. 

अन्‌ आला अमेरिका गव्हमेंटचा संदेश 
हताश झालेला पियुष अमळनेर न येता नाशिक येथे काकांकडे थांबला. दुसऱ्या दिवशी झालेली परिस्थिती त्याने अमेरिकेत व्हिजा ऑफिसला कळविली. त्यांनी लागलीच या गुणी अभियंत्यास मदत करण्यासाठी जोमाने चक्र फिरविले. अमेरिका गव्हर्नमेंटला त्यांनी अमेरिकेचा अभियंता भारतात अडकला असून त्याला तात्काळ आणण्यासाठी शिफारस केली. याचा चमत्कार असा झाला की पियुषला जुन्या व्हिजावरच अमेरिकेत पाठवा असा मेल तेथील गव्हर्नमेंटकडून भारतात आला. विमानतळ प्रशासनास देखील तशा सूचना देण्यात आल्याने तातडीने सकाळी सातच्या फ्लाईटचे बुकिंग पियुषला मिळाले. मध्यरात्रीच तो विमानतळावर पोहोचून अगदी कोणतीही चौकशी न होता, पियुषचे अमेरिकेकडे हवाई उड्डाण झाले. हे चित्र पाहून पियुषच्या आई- वडीलांचे ही डोळे पाणावले होते. कारण अनेक संकटातून पियुष मार्गस्थ झाला होता. 

loading image