राज ठाकरेंकडून अमितची लग्नपत्रिका भगवतीचरणी अर्पण

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

वणी (नाशिक) :  महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांचे लग्नाची पत्रिका साडेतीनशक्ती पीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या वणी गडावर सप्तशृंगीच्या चरणी अर्पन करीत देवीची महाआरती केली. 

वणी (नाशिक) :  महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांचे लग्नाची पत्रिका साडेतीनशक्ती पीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या वणी गडावर सप्तशृंगीच्या चरणी अर्पन करीत देवीची महाआरती केली. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून आज. ता.२१ दौऱ्याचा चौथा दिवस आहे.  आज सकाळी साडो अकरा वाजता श्री. ठाकरे यांचे वणी गडावर आगमन झाल्यानंतर ते रोपवेने थेट सप्तशृंगी मंदीरात गेले. यावेळी श्री. ठाकरे यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेत आपला सुपुत्र अमित ठाकरे यांचे लग्नाची पत्रिका देवी चरणी अर्पन केली. येत्या 27 जानेवारीला अमित ठाकरे  यांचा विवाह  सोहळा संपन्न होणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह फॅशन डिझाइनर मिताली बोरुडे यांच्याशी होणार आहे. हिंदु पंरपरेनूसार लग्न पत्रिका सर्वात आधी देवाच्या चरणी ठेवण्याची परंपरा आहे.

राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली यांच्या लग्नाची पत्रिका देवी चरणी अर्पण केली. यानंतर दुपारी बारा वाजता देवीची श्री. ठाकरे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ. राहुल ढिकले आदींसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 27 जानेवारीला २०१८ दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे मुंबईतील लोअर परळ भागातल्या सेंट रेजिस येथे विवाह बंधनात अडकणार आहे.
 

Web Title: marathi news amit marriage